Koregaon APMC News : कोरेगावात लोकांच्या उद्रेकाला सुरवात; विरोधकांचे गणित त्यांच्यावरच उलटले... शशिकांत शिंदे

Shashikant Shinde कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने मिळवलेल्या विजयानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी ल्हासुर्णे येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

-राजेंद्र वाघ

Shashikant Shinde News : पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे दिल्लीचे, राज्याचे व आपल्या विभागातील राजकारण आता लोकांना नको आहे. त्यात बदल करण्याची लोकांची भावना कोरेगाव बाजार समितीच्या Koregaon APMC निवडणुकीत दिसून आली. लोकांच्या उद्रेकाला या निवडणुकीपासून सुरवात झाली आहे. विरोधकांचे निवडणुकीचे गणित त्यांच्यावरच उलटले आहे, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी केली आहे.

कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने मिळवलेल्या विजयानंतर ल्हासुर्णे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, "रामराजे नाईक निंबाळकर, मी, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील, सुनील माने यांच्यासह आमचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने लढले. या निवडणुकीतील विजयामुळे कार्यकर्त्यांना उर्जा मिळाली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मोठ्या विजयाचा आनंद उद्याच्या निवडणुकीसाठीची जिद्द कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे दिल्लीचे, राज्याचे व आपल्या विभागातील राजकारण आता लोकांना नको आहे. त्यात बदल करण्याची लोकांची भावना या निवडणुकीत दिसून आली आहे. लोकांच्या उद्रेकाला या निवडणुकीपासून सुरवात झाली आहे. विरोधकांचे निवडणुकीचे गणित त्यांच्यावरच उलटले आहे.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
koregaon APMC : शशिकांत शिंदेंचे वर्चस्व कायम; महेश शिंदेंचा दारुण पराभव

तालुक्याच्या तीन मतदारसंघातील विभाजनामुळे अपयशाचे खापर मधल्या भागावर फोडले जायचे. या वेळी मात्र मधल्या भागातूनच अधिक मताधिक्य मिळाले आहे. विरोधातील सूज्ञ मतदारांनीही तिकडच्या जाचामुळे आम्हाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली होती. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींचा पराभव होऊ शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon APMC News : मी आणि शशिकांत शिंदेंनी उत्तरे द्यायची; बाकीच्यांनी निवांत राहायचे : रामराजे संतापले

या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय राहिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नाही; परंतु यापुढील काळात त्यांना सन्मानाने सोबत घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणुका ताकदीने लढवून विजय मिळवू." छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन समोरचा सध्याचा या देशातील, राज्यातील व या विभागातील शत्रू पराभूत करू, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara APMC Election : स्थानिक आघाड्यांना साथ; अनैसर्गिक युतीला नाकारले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com