बिनविरोधसाठी शरद पवारांच्या प्रयत्नानंतरही प्रतापगड कारखान्याची निवडणूक लागली

सौरभ शिंदे Saurabh Shinde व दीपक पवार Deepak Pawar हे जिल्हा परिषद ZP निवडणुकीतील Election कुडाळ गटातील Kudal Gat एकमेकांचे पारंपारिक विरोधक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
Saurabh Shinde, Deepak Pawar
Saurabh Shinde, Deepak Pawarsarkarnama
Published on
Updated on

कुडाळ : जावळी तालुक्यातील सोनगांव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतही बैठक होऊनही तालुक्‍यातील आजी माजी आमदारांसह दिग्गज नेत्यांचे प्रयत्नांना अपयश आले. शेवटी कारखान्याची निवडणूक लागली असून अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी संचालकांच्या 21 जागांसाठी एकुण 36 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. संस्थापक सहकार पॅनेलचे प्रमुख सौरभ शिंदे व विरोधात बचाव पॅनेलचे प्रमुख दीपक पवार यांच्या गटात सरळसरळ लढत होत आहे.

जावळी तालुक्यात प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. मागील तीन वर्षांपासून साखर कारखान्याचे गाऴप बंद आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तालुक्यातील दिग्ग्ज नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. त्यामुळे प्रतापगड कारखाना बिनविरोध करावा, असे आवाहन कारखान्याचे प्रमुख सौरभ शिंदे यांनी तालुक्यातील सर्व नेतेमंडळींना केले होते. त्यानुसार कारखाना गट, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ आदी सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या स्वतंत्र बैठकाही झाल्या होत्या.

Saurabh Shinde, Deepak Pawar
शरद पवार म्हणाले, माझ्यावर अनेकांनी आरोप केले; पण...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतही बिनविरोधसाठी बैठक झाली होती. त्यानुसार सर्व गट एकत्र येऊन समविचारी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. मात्र, निवडणुक जाहीर झाल्यापासून बचाव पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे व सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान निर्माण करण्याचा पवित्रा राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी घेतला. तो शेवटपर्यंत कायम राहिला. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही तरी राजकीय घडामोडी व तडजोडी होतील व निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा तालुक्यातील सभासदांना होती.

Saurabh Shinde, Deepak Pawar
प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा; उदयनराजेंची उपराष्ट्रपतींकडे मागणी

अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संपुष्ठात आली. प्रतापगड कारखान्याच्या 21 जागांसाठी 36 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिेले आहेत. 21 जागांपैकी तीन उमेदवार सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलमधून बिनविरोध निवडून आले असल्याने आता उरलेल्या 18 जागांसाठी 13 मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. आजपासून निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे. सहकार पॅनेलचे प्रमुख सौरभ शिंदे व बचाव पॅनेलचे प्रमुख दीपक पवार यांच्या गटात आता सरळसरळ लढत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे.

Saurabh Shinde, Deepak Pawar
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

सौरभ शिंदे व दीपक पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीतील कुडाळ गटातील एकमेकांचे पारंपारिक विरोधक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 21 जागांपैकी सौरभ शिंदे गटाच्या महिला राखीव गटातून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. शोभाताई बारटक्के, माजी संचालिका सौ. ताराबाई पोफळे या दोन महिला व सोसायटी मतदारसंघातून लालसिंगराव शिंदे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल मोरे असे एकुण तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे संस्थापक सहकार पॅनेलने निवडणुकीपूर्वीच विजयाची सुरूवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com