Ramdas Athawale News : मुख्यमंत्री व्हावे, अशी प्रत्येक नेत्याची इच्छा असते. अजित पवारांचीही Ajit Pawar आहे. मात्र, ती सगळ्यांचीच पूर्ण होत नाही. पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असे नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athawale यांनी केले.
मंत्री आठवले हे सांगली दौऱ्यावर निघाले असता सातारा येथे थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यामध्ये कुटुंबियांशी, शेतकऱ्यांशी भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर टांगती तलवार नसून, ती उध्दव ठाकरे यांच्यावर आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले नसते.
संजय राऊतांच्या भुलथापांना बळी पडून ठाकरे राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. उध्दव यांनी आमदारांची कामे केली नाहीत. लोकांना भेटत नव्हते. त्यामुळेच शिवसेनेत महाबंड झाले. सवार्ेच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला धोका होणार नाही. महायुती भक्कम आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत बॅनर लावणारे उत्साही कार्यकर्ते असतात. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकांची असते. पण, ती पूर्ण होत नाही. यापूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार आले होते, तेव्हा अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. पण, तेव्हा संधी मिळाली नाही. आता लवकर संधी मिळेल असे नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, जनतेशी संवाद साधणारे आहेत, ते भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, तरीही शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, असेही मंत्री आठवले म्हणाले.
राज ठाकरे यांनी स्वतंत्र रहावे. त्यांना भाषण करायला आवडते. ते आमच्यासोबत आले तर त्यांना येवढे भाषण करायला मिळणार नाही. त्यांची आम्हाला आवश्यकता नाही. त्यांना सोबत घेणे भाजपला देश पातळीवर परवडणारे नाही. माझा पक्ष आहे, तोपर्यंत राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असा टोमणाही मंत्री आठवले यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.