माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

सातारा पोलिसांनी माजी सरपंचासह पत्नीला अटक केली आहे. दोघांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
Sindhu Sanap
Sindhu SanapSarkarnama

सातारा : जिल्ह्यातील पळसवडे (Palaswade) गावच्या माजी सरपंचाने (Sarpanch) वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिला कर्मचारी तीन महिन्यांच्या गर्भवती असूनही मारहाण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर माजी सरपंचासह पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

माजी सरपंच रामचंद्र जानकर (Ramchandra Jankar) आणि त्यांच्या पत्नी महिला नवरक्षक सिंधू सानप (Sindhu Sanap) आणि पतीलला मारहाण केली आहे. जानकर हे स्थानिक वनसमितीचे सदस्य आहेत. त्यांना न विचारता वन मजूरांना इतर नेल्याचा राग आल्याने सानप यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. सानप यांच्या तक्रारीनंतर जानकर व त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sindhu Sanap
धक्कादायक : भारतात घुसत चीनकडून युवकाचं अपहरण; भाजप खासदारानंच दिला पुरावा

सातारा (Satara) पोलिसांनी (Police) बुधवारी दोघांनाही अटक केली आहे. याबाबत बोलताना सानप म्हणाल्या, कामावर रुजू झाल्यापासून ते मला धमकी देत आहे. पैशांची मागणी करत होते. पण त्यांना नकार देत होते. बुधवारी कामावरून घरी परतत असताना त्यांनी मला मारहाण केली. माझ्या पतीला स्लीपरने मारले, असा आरोप सानप यांनी केला आहे.

या घटनेची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. याबाबत सातारा पोलीस अधिक्षकांकडे अहवाल मागवला असून कटक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही घटनेचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com