नगर अर्बन बँकेत सभासद नसलेल्या व्यक्तीला केले तज्ज्ञ संचालक

अहमदनगर शहरात मुख्यालय असलेल्या नगर अर्बन बँकेवर ( Nagar Urban Bank ) रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लावले आहेत.
Nagar urban bank
Nagar urban bankSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर शहरात मुख्यालय असलेल्या नगर अर्बन बँकेवर ( Nagar Urban Bank ) रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लावले आहेत. मागील चार वर्षांपासून ही बँक वादाच्या भोवऱ्यात आहे. या बँकेतील नूतन अध्यक्ष व संचालक मंडळाने नुकतेच दोन जणांना तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्त केले आहे. मात्र यातील एक जण बँकेचा साधा सभासदही नसल्याचे समोर आले आहे. या नियुक्ती विरोधात बँकेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा यांनी आवाज उठविला आहे. त्यामुळे बँकेत नवीन वादाला तोंड फुटले आहे. Expert Director, a non-member of Nagar Urban Bank: New controversy erupts

नगर अर्बन बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने सुरवातील चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीच्या अहवाला नंतर तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासक नियुक्त केला होता. दोन महिन्या पूर्वी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधकांनी बँकेत निवडणूक घेऊन नूतन संचालक मंडळाची नियुक्ती केली. नूतन संचालक मंडळ सत्कार स्वीकारत असतानाच 6 डिसेंबरला रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळाचे अधिकार गोठवत नगर अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केले.

Nagar urban bank
'नगर अर्बन बँक वाचविणार; दिलीप गांधींच्या मदतीची परतफेड करणार'

नगर अर्बन बँकेत दोन दिवसांपूर्वी दोन जणांना तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यात अॅड. राहुल जामदार व सीए गौरव गुगळे यांचा समावेश आहे. दोघेही त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. मात्र बँकेच्या कायद्यानुसार बँकेचा सभासद असलेला व्यक्तीच तज्ज्ञ संचालक नेमला जाऊ शकतो. नियुक्त केलेल्या दोघांपैकी अॅड. जामदार हे बँकेचे सभासद नाहीत. हाच मुद्दा घेऊन राजेंद्र चोपडा यांनी काल ( शुक्रवारी ) नगर अर्बन बँकेत जाऊन अध्यक्ष राजेंद्र आगरवाल व सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी यांना जाब विचारला.

या संदर्भात चोपडा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नगर अर्बन बँकेने सभासद नसलेला व्यक्ती तज्ज्ञ संचालक म्हणून नेमलेला आहे. असा व्यक्ती तज्ज्ञ संचालक म्हणून नेमता येत नाही. बँकेचा सभासदालाच संचालक करता येते, अशी कायद्यात तरतूद आहे. जो सभासद नाही तो संचालक होऊ शकत नाही. संचालक मंडळाने केलेली ही मोठी चूक आहे.

Nagar urban bank
नगर अर्बन बॅंक सोनेतारण गैरव्यवहार ! शेवगावच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

चोपडा पुढे म्हणाले की, मी बँकेच्या अध्यक्षांची काल ( शुक्रवारी ) भेट घेऊन स्पष्ट सांगितले आहे. त्यांच्या बरोबर दोन संचालक त्यावेळी होते. त्यांना सांगितले की, चुकीच्या पद्धतीने तज्ज्ञ संचालक नेमले आहेत. ते त्यांनी मान्यही केले आहे. मी आज नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष, जिल्हा उपनिबंधक व मल्टिस्टेट बँकांच्या दिल्लीतील कार्यालयाला लेखी तक्रार करणार आहे. नेमलेले तज्ज्ञ संचालक जामदार हे बँकेचे सभासद असतील तर बँकेने सभासदत्त्वाचा शेअर, कधी सभासद झाले याची माहिती बँकेच्या अध्यक्षांनी जनतेला द्यावी.

बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी वसुलीसाठी मोठ्या थकबाकीदाराकडे चकरा मारायला हव्यात. वसुलीला जाताना थकबाकीदाराचे म्हणणे रेकॉर्ड करायला हवे. म्हणजे बँकेचे पैसे कोणी घेतले हे सर्वांना कळेल, असा टोलाही त्यांनी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाला लगावला. या संदर्भात नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष अग्रवाल व सुवेंद्र गांधी यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com