शेतकरी संघटना मागतेय उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई

राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Raghunath Patil
Raghunath Patilsarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या ऊस केवळ साखर कारखान्याच्या हलगर्जीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उशिरा तुटलेल्या उसाला एकरी 25 हजार रुपये व गाळपा अभावी शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ( Farmers' union demands compensation of Rs. 1 lakh per acre )

16 एप्रिल रोजी श्रीरामपूर येथे संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस प्रश्नावर परिषद होणार आहे. शेतकरी संघटनेचे नेते अॅड. अजितराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, संपर्क प्रमुख शिवाजी जवरे, युवा आघाडी प्रमुख बच्चू मोढवे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, नेवासा तालुका अध्यक्ष हरिभाऊ तुवर,भास्कर तुवर, संदीप उघडे, विलास कदम, बाळासाहेब शिरसाठ गोविंदराव वाघ, सुदामराव औताडे, अॅड. सर्जेराव घोडे विष्णुपंत खंडागळे, किशोर पाटील, नितीन पटारे, कैलास पवार, संजय वमने, शरद पवार, बबन उघडे प्रभाशंकर तुवर, मनोहर मटकर आदी उपस्थित होते.

Raghunath Patil
सरकारी कर्मचाऱ्यांना महिना पाचशे रूपयेच पगार द्या : रघुनाथ पाटील 

या बैठकीत दोन साखर कारखान्या सह दोन इथेनॉल कारखान्यांमधील हवाई अंतराची 25 किलोमीटरची अट रद्द व्हावी. स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची रुपये दहा रुपयांची कपात ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बिळातून रद्द करावी. वीज बिल, पाणीपट्टी सह संपूर्ण कर्जमाफी मिळावी. अशा मागण्यांवर चर्चा झाली. 16 एप्रिल रोजी श्रीरामपूर येथे संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस प्रश्नावर परिषद होणार आहे. त्यात ऊस प्रश्नावर जोरदार मांडणी करून दुर्लक्ष झाले तर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

Raghunath Patil
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

''साखर कारखान्यांनी गाळप क्षमतेपेक्षा जास्त नोंदी घेतलेने व कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणत असल्याने तोडणी नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. ऊसाचे नुकसान झाले असताना. व्यवस्थापनाने हात झटकले आहेत. होणारे नुकसान पाहता भरपाई मिळणे गरजेचे आहे.''

- अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, अहमदनगर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com