रोहित पवार- राम शिंदे लढतीत सुरेश धसांचे महत्व कायम!

ही लढत कर्जत नगरपंचायत निवडणुकीची पुनरावृत्ती ठरणार का यावर जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - जामखेड नगरपालिकेत सध्या प्रशासक राज आहे. काल ( सोमवारी ) कर्जत-जामखेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी नगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर केले. त्यामुळे आता राजकीय तयारीला वेग आला आहे. नगरपालिकेच्या मागिल निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी लढत झाली होती. यंदाही हीच लढत दिसून येईल. जामखेड नगरपालिकेत आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) समर्थकांत लढत होणार आहे. ही लढत कर्जत नगरपंचायत निवडणुकीची पुनरावृत्ती ठरणार का यावर जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा रंगली आहे. ( Fight between Rohit Pawar and Ram Shinde supporters will take place in Jamkhed: Attention has been paid to the role of Suresh Dhas )

मागील निवडणुकीत माजी आमदार सुरेश धस यांनी जामखेडमध्ये प्रचाराची धुरा संभाळत राष्ट्रवादीला सत्ता मिळवून दिली. तेच सुरेश धस हे आता भाजपमध्ये आहेत. तर त्यांचे निकटवर्तीय असलेले सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे सुरेश धस कोणाला मदत करणार यावर पुढील गणिते ठरणार आहेत. शिवाय विखे गटातील अमोल राळेभात यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीपासून कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांचे वारे वाहत आहे.

Ram Shinde Vs Rohit Pawar
Video: भाजपाकडुन ताकदीचा वापर करुन ED पासुन पैशापर्यत वापर; रोहित पवार

राम शिंदे यांना भाजपने कोअर कमिटीत घेतले तसेच त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. जामखेडमध्ये विखे गटाचीही ताकद आहे. ही ताकद या निवडणुकीत किती दिसणार यावर काही नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे. भाजपचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेल्याने भाजपमधील युवा कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळण्याची चिन्हे आहेत. राम शिंदे हे जामखेड तालुक्यातच राहतात. मागील 25 वर्षांपासून जामखेड तालुक्यात भाजपचे मजबूत संघटन आहे. मात्र जामखेड नगरपालिकेत राष्ट्रवादीने सत्ता मिळविली होती. येथे निवडून आलेले नगरसेवक कधी कोणत्या पक्षात अचानक निघून जातील याचा नेमनाही. मागील सहा वर्षे हे जामखेड सह जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही सत्तेसाठीची रस्सीखेच सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.

Ram Shinde Vs Rohit Pawar
रोहित पवार-राम शिंदे एकाच मंचावर : ना एकमेकांकडे पाहिले... ना बोलले...

जामखेड मधील 12 प्रभागांतून प्रत्येकी दोन प्रमाणे 24 नगरसेवक निवडले आणार आहेत. जामखेड तहसील कार्यालयासमोरच्या प्रांगणात हा आरक्षण जाहीर करण्याचा कार्यक्रम झाला. मागील निवडणुकीत पेक्षा यंदा नगरसेवकांची संख्या वाढली आहे. यात अनुसूचित जातीसाठी एक वाढीव जागा तर अनुसूचित जातीसाठी एका जागेचे आरक्षण पडल्याने त्यांना प्रथमच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळली.

Ram Shinde Vs Rohit Pawar
रोहित पवार-राम शिंदे, पिचड, लंके, औटी यांच्या गावातील मतदानाकडे लक्ष

ओबीसी आरक्षण

माजी मंत्री राम शिंदे यांनी जाहीर केल्या प्रमाणे ते जामखेड नगरपालिकेत 27 टक्के उमेदवार ओबीसींचे देणार का? हेही या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राम शिंदे यांचे ते वक्तव्य या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरू शकते.

प्रभाग निहाय आरक्षण.

प्रभाग - 1 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

प्रभाग - 2 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

प्रभाग - 3 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

प्रभाग - 4 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

प्रभाग - 5 अ अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब सर्वसाधारण

प्रभाग - 6 अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण

प्रभाग - 7 अ सर्वसाधारण महिला प्रभाग, ब सर्वसाधारण

प्रभाग - 8 अ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला

प्रभाग - 9 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

प्रभाग - 10 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

प्रभाग- 11 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

प्रभाग - 12 अ अनुसूचित जाती महिला, ब, सर्वसाधारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com