भाजप आमदार गोरेंना दुसरा धक्का; फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल

मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात जयकुमार गोरे यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Jayakumar Gore Latest Marathi News, Satara Political News
Jayakumar Gore Latest Marathi News, Satara Political NewsSarkarnama
Published on
Updated on

सातारा : मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) नकार दिला आहे. त्यानंतर त्यांना आता दुसरा धक्का बसला आहे. कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांकडे मायणी (ता. खटाव) येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थावर मालमत्ता नोंदवण्यासाठी एका दैनिकाच्या बनावट अंकात नोटीस छापून धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. (Jaikumar Gore Latest Marathi News)

आमदार गोरे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह सचिव सोनिया जयकुमार गोरे, खजानिस अरुण दादासो गोरे, सदस्या शैलेजा अशोक साळुंखे, स्मिता विरेंद्र कदम, महमंद फारुक खान यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेचे मायणी येथील आजीवन सदस्य आप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांनी त्याबाबत वडूज पोलिसांत तक्रार दिली आहे.

Jayakumar Gore Latest Marathi News, Satara Political News
निवडणूक आयोगाने ठाकरे सरकारला हवे तेच केले; सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

आमदार गोरे यांच्यासह सहा जणांनी 16 ऑगस्ट 2019 रोजी संस्थेच्या मालकीच्या जमीन मिळकतीची नोंद धर्मादाय कार्यालयात पीटीआर उताऱ्यास करत संस्थेस उतारा मिळणेबाबत प्रस्ताव सादर केला. तर मायणीतील स्थावर मिळकती सचिव सोनिया गोरे यांनी पाच जून 2020 रोजी बक्षिस पत्राद्वारे सोसायटीच्या नावे बक्षिसपत्र करून घेतली होती, असं देशमुखांनी तक्रारीत म्हटले आहे.

सहा जणांनी संस्थेच्या सभासदांना अंधारात ठेवून मालमत्तेसंबंधीची जाहीर नोटीस एका दैनिकात बारा जुलै रोजी प्रसिध्द केली. त्यानंतर तेरा जुलैला तो बनावट अंक धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला. सादर केलेली नोटीस फिर्यादी देशमुख यांना त्याच वृत्तपत्राच्या अन्य अंकात कुठेही आढळली नाही. नियमितचा अंक व नोटिशीच्या अंकातील मजकुरात भिन्नता आढळल्याचा दावा देशमुखांनी तक्रारीत केला आहे.

Jayakumar Gore Latest Marathi News, Satara Political News
भाजप आमदार जयकुमार गोरे यांना हायकोर्टाचा दणका: अटक होण्याची शक्यता

दैनिकाच्या संपादकांनीही तो अंक आम्ही छापलेला नाही, असा लेखी खुलासा केला आहे. सहा जणांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे संस्थेस पी.टी.आर. उतारा मिळणेबाबत सर्वप्रकारचे कामकाज करण्यासाठी अरूण गोरे यांची निवड करून मिळकतीची विल्हेवाट लावणे, मिळकतींवर कर्ज प्रकरणाचा आर्थिक बोजा चढवून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने बनावट अंक प्रसिध्द करून फसवणूक केल्याचे देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com