हरिहरेश्वर बँक घोटाळाप्रकरणी पाच जण ताब्यात; मुख्य संशयित न्यायालयात हजर

या बँकेत ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३३४ रुपयांचा घोटाळा झालेला आहे. त्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.
Harihareshwar Bank
Harihareshwar Bankwai reporter
Published on
Updated on

वाई : वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३३४ रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल असून या प्रकरणात काल (मंगळवारी) आर्थिक गुन्हे शाखेने पाच जणांना ताब्यात घेतले. यामुळे वाई शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बँकेच्या घोटाळ्या प्रकरणाच्या तपासासाठी मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक वाईत आले होते. त्यांनी रमेश ज्ञानेश्वर खामकर, ॲड. ललित सूर्यकांत खामकर, ॲड. अविनाश अशोक गाडे, तुषार सखाराम चक्के, अमोल खोतलांडे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक चौकशीअंती या पाच जणांना ताब्यात घेतले.

Harihareshwar Bank
मोठी बातमी : बॅँक परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये होणार

त्यानंतर मुख्य संशयित बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर स्वतः दुपारी सातारा येथील न्यायालयात हजर झाले. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आज (बुधवारी) अटक होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच बँकेचे सरव्यवस्थापक रमेश दगडू जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे यांनी ही कारवाई केली. या कारवाईत विक्रम कणसे, मनोज जाधव, अजित पवार, प्रसाद जाधव, संजय मोरे यांनी भाग घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com