शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा : सातारा-जावलीतील अतिवृष्टीबाधित रस्ते, पूलांसाठी २५ कोटी

हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांचे आभार Thanks मानले आहेत.
Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
Ajit Pawar, Shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये सातारा, जावली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान झाले होते. या रस्त्यांच्या आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाच्या ३०५४-२४१९ रस्ते व पुल परिरक्षण कार्यक्रम अंतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत सातारा आणि जावली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले होते तर अनेक रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान झाले होते. रस्ते खराब झाल्याने वाहतुकीला अडथळा होऊन लोकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करणे आणि पूल बांधणे अत्यावश्यक होते. या कामांसाठी निधी मिळावा म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी करून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला होता.

Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
महाराष्ट्र केसरीची संयोजकांकडून उपेक्षा; पण, शिवेंद्रराजेंनी जाहीर केले पाच लाख..

शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून श्री. पवार यांनी सातारा- जावली मधील बाधित १० पूल आणि ५६ रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मंजूर झालेल्या निधीमधून सातारा तालुक्यातील लिंब शेरी रस्ता क्र.०/०० ते ३/०० करण्यासाठी ७० लाख, नेले फरासवस्ती रस्ता ३० लाख, कुशी नागेवाडी रस्ता ५८ लाख, बेंडवाडी परमाळे पिलाणीवाडी नरेवाडी कौंदणी पिरेवाडी रस्ता १ कोटी, घाटवण जोड रस्ता ४ लाख, कुस.बु.ते कुस खुर्द ते इजिमा-६१ रस्ता ३० लाख, ताकवली जोड रस्ता १० लाख, वेणेखोल नावली ते इजिमा ६० (पाटेघर फाटा) ४५ लाख, धावली जळकेवाडी ते धनगरवाडी रस्ता ५० लाख, धावली झुंगटी रस्ता १५ लाख.

Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
संजय पाटील यांच्या नावाने 'महाराष्ट्र केसरी'स एक लाखांचे बक्षिस

प्रजिमा-२९ ते पांगारे पळसावडे सांडवली इजिमा-६१ (केळवली) रस्ता १ कोटी २५ लाख, पोगरवाडी झरेवाडी ते करंडी रस्ता ६० लाख, शाहुपुरी अंबेदरे रस्ता २५ लाख, उपळी ते शेळकेवाडी रस्ता ३५ लाख, वेचले शिवाजीनगर ते करंडी रस्ता ८० लाख, वेचले भाटमरळी रस्ता ६० लाख, वेचले शेळकेवाडी ते प्रजिमा-३१ पर्यंत ५० लाख, दरे बु. ते कोंडवे रा.मा.१४० रस्ता २५ लाख, भाटमरळी ते प्रजिमा-३१ रस्ता ३० लाख, इजिमा-६० ते आरगडवाडी पोहोच रस्ता १५ लाख, सोनवडी आरे दरे रस्ता ५५ लाख, साठेवाडी जोड रस्ता २८ लाख, जावली तालुक्यातील रामा १४० ते नांदगणे पुनवडी रस्ता ४५ लाख, केळघर ते डांगरेघर रस्ता २५ लाख, रा.मा.१४० ते वरोशी वाहिटे मुकवली ७५ लाख, रा.मा.१४० ते रेंगडी अप्रोच रस्ता ४५ लाख.

Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
Video : खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा कार्यक्रमात उडवली कॉलर...

कुरळोशी ते गाढवलीवस्ती वारणेवस्ती ६० लाख, काटवली शिंदेवाडी रुईघर रस्ता १५ लाख, आखेगणी बनवस्ती रस्ता ते इजिमा २९ सायघर रस्ता ४० लाख, नरफदेव जोड रस्ता धनगरवाडी रस्ता ३० लाख, सायगाव पवारवाडी, मोरेवाडी येरुणकरवाडी रस्ता २५ लाख, प्रजिमा २६ ते उंबरेवाडी पिसाडी रस्ता १५ लाख, निपाणी ते प्रजिमा २६ रस्ता ३० लाख, पिंपरी तर्फ मेढा जोड रस्ता २५ लाख, सांगवी तर्फ मेढा रस्ता ३० लाख, सांगवी तर्फ कुडाळ रस्ता ३० लाख, प्रजिमा २६ ते केळघर सोळशी रस्ता १० लाख, कसुंबी ते दुंद रस्ता १५ लाख, प्रजिमा ४८ ते म्हातेमुरा रस्ता ३५ लाख, तेटली ते कोयनासंगम रस्ता ते ग्रामा १५८ हरिजनवस्ती रस्ता २० लाख, करंडी तर्फ मेढा इजिमा ४८ रस्ता १० लाख, भणंग जोड रस्ता १५ लाख, महामुलकरवाडी रायगाव रस्ता २० लाख,

Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
या तर चोराच्या उलट्या बोंबा; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना प्रतिउत्तर...

इजिमा ४४ ते भोगवली तर्फ कुडाळ रस्ता २० लाख, पिंपळी ते पवारवाडी ते बिरामणेवाडी २० लाख, हुमगाव झरेवाडी रस्ता २५ लाख, इजिमा २८ सायघर ते कावडी रस्ता १ कोटी, दरेवाडी धोंडेवाडी मानकरवस्ती ते प्रजिमा १९ रस्ता १५ लाख, रुईघर ते सणसआळी रस्ता ३० लाख, कुडाळ सावताचीवाडी आडे बेलवडे, मरडमुरा ३० लाख, गांजे ते घरातघर जोड रस्ता ४० लाख, आपटी ते सोळशी रस्ता ३० लाख, वाकी जोड रस्ता ३० लाख, वाघळी ते फळणी रस्ता २५ लाख, वाघदरे अॅप्रोच रस्ता ३० लाख, आलेवाडी खिंड ते रेंडीमुरा कुंभारगणी धनगरपेढा (मोरखिंड) भाग-रेंडीमुरा पोहोच रस्ता ६० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, उदयनराजेंना माझं बोलणं झोंबलं....

१० पुलांच्या कामासाठी चार कोटी ३० लाख रुपये मिळाले आहेत. यामध्ये देशमुखवस्ती इंदवली डेरेवाडी सोनगांव रायागांव ते रामा ४ रस्ता (२५ लाख), केळघर ते डांगरेघर रस्ता (१ कोटी ५० लाख), रा.मा.१४० ते वरोशी वाहिटे मुकवली वाटंबे रस्ता (७५ लाख), रा.मा.१४० ते रेंगडी अॅप्रोच रस्ता (४० लाख), हातगेघर इजिमा ४४ ते पानस रस्ता (५० लाख), काटवली शिंदेवाडी रुईघर रस्ता (२५ लाख), आखेगणी बनवस्ती रस्ता सायघर रस्ता (१० लाख), नरफदेव जोड रस्ता धनगरवाडी रस्ता (३५ लाख),

Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची घाई : रामराजे

सायगाव पवारवाडी मोरेवाडी रस्ता व्हाया ग्रामा १२७ येरुणकरवाडी रस्ता (१० लाख), प्रजिमा २६ ते उंबरेवाडी पिसाडी रस्ता (१० लाख) या मार्गावरील १० पुलांच्या कामासाठी निधी मिळाला आहे. तातडीने निविदा प्रक्रीया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून तातडीने कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com