आता काँग्रेसच्या सतेज पाटलांचा नंबर; भाजप नेता करणार ईडीकडे तक्रार

कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. त्याची माहिती आमच्याकडे आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. त्याची माहिती आमच्याकडे आहे. याबाबत आम्ही सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) तक्रार करणार आहे, असा आरोप भाजपमधील (bjp) महाडिक गटाचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी (ता. २५ मार्च) केला. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी चुकवलेल्या घरफाळ्याचे दंड व्याज भरलेले नाही. प्रशासनही कारवाई करत नाही. पालकमंत्र्यांनी दंड, व्याजाची रक्कम भरावी, असेही कदम यांनी यावेळी सांगितले. (Former Mayor of Kolhapur Sunil Kadam Satej Patil's complaint to ED)

या वेळी सुनील कदम म्हणाले की, ‘महापालिका सामान्य जनतेला वेठीस धरत आहे. कोरोना आणि महापूर यांनी होरपळलेल्या कोल्हापूरकरांना अद्याप दंड, व्याज सवलत दिलेली नाही. घरफाळा, पाणीपट्टी वसुली अपेक्षित न झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. असे असतानाही प्रशासक कांदबरी बलकवडे यांच्याकडे वारंवार तक्रार, पाठपुरावा करूनही त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या घरफाळ्याच्या दंड, व्याज वसूल करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सतेज पाटील यांना ‘पंधरा-दोन’ची नोटीस काढून पाच महिने झाले तरी अद्याप पुढील कार्यावाही केलेली नाही. यामध्ये प्रशासनही दोषी आहे.

Satej Patil
विधानसभा अध्यक्षांची निवड का झाली नाही...अजित पवारांनी सांगितले कारण..!

पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या काही मिळकती अशा आहेत, ज्यांच्या घराफाळ्यामध्ये अनियमितता आहे. पीव्हीआर, शॉपरस्टॉप यांचे भाडेकरार योग्य नाहीत. या मिळकतींच्या घरफाळा आणि दंड, व्याज यापोटी मिळणारी रक्कम ही सुमारे ३० कोटी आहे. ही वेळच्यावेळी वसूल केली असती तर महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर झाले असते. प्रशासनाने पालकमंत्र्यांना दंड, व्याज का लावले नाही, असा सवालही कदम यांनी केला.

Satej Patil
राऊतांना टोमणा मारत SP सातपुते यांची गृहमंत्र्यांनी केली पाठराखण!

माजी महापौर कदम म्हणाले, बावड्यातील एक इमारत ही पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आहे, त्याला २१ वर्षे घरफाळा लावलेला नाही. यातील दोन मजले बेकायदेशीर आहेत. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांना एक न्याय आणि सामान्य जनतेला एक न्याय प्रशासनाचे हे धोरण चुकीचे आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी एक आर्थिक घोटाळा केला आहे. त्याची रक्कम हजारो कोटींची आहे. याबाबत आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. याबाबत आम्हाला कोणी सांगितलेले नसून आम्ही स्वतःहून ही तक्रार करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com