'पाणी आणि सहकार'साठी शंकरराव स्वपक्षीयांशी लढले; प्रश्न मार्गी लावूनच शांत झाले...

माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय 93) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
Shankarrao Kolhe
Shankarrao KolheSarkarnama
Published on
Updated on

कोपरगाव ( जि. अहमदनगर ) - सहकाराचे महामेरू, तालुक्याचे भाग्यविधाते, प्रणेते ,लढवय्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय 93)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने सहकारी साखर उद्योगात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

24 मार्च 1929 साली जन्मलेले माजी मंत्री कोल्हे यांचे शिक्षण बी एस सी ऍग्री झाले असून विदेशात लागलेल्या नौकरीला नाकारून मी माझ्या देशाची व समाजातील सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झोकून देईल या भावनेने ते आयुष्यभर कार्यरत राहिले. वयाच्या 21 व्या वर्षी येसगावचे सरपंच म्हणून निवडून येत त्यांनी राजकीय प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली. 1959 साली त्यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद भूषविले.

Shankarrao Kolhe
आवर्तनासाठी शेतकरी रस्त्यावर उतरतील : स्नेहलता कोल्हे यांचा इशारा

1962 साली त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक म्हणून उभारणी करून चेअरमनपद भूषविले. सहकारी कारखानदारी व शेतकरी टिकावा म्हणून त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करत रासायनिक प्रकल्पासह वीज निर्मिती, उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करत देशाचे पंतप्रधान यांचे लक्ष वेधले. इतर कारखान्यांना आदर्शवत मार्गदर्शन केले.

राज्यासह तालुक्याच्या विकासाचा सतत ध्यास घेतल्याने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अनेक वर्षे त्यांनी तालुक्याचे आमदार म्हणून कार्य करताना मंत्री मंडळात पदे भूषवून आपली वेगळी छाप पाडली. शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या तळमळीने तालुक्यात शैक्षणिक हब निर्माण केला.यशवंत कुकुट व गोदावरी दूध संघाची स्थापना करत शेतीला जोडधंदा उपलब्ध करून दिला. माजी मंत्री शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेवर त्यांना संधी दिली त्याचे सोने करत रयतेचे जाळे राज्यभर परसारविण्यात कोल्हे यांचा मोठा वाटा आहे. रयत शिक्षण संस्थेचे त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

Shankarrao Kolhe
स्नेहलता कोल्हे यांनी पिचड कुटुंबीयांना भेटून दिली श्रद्धा व सबुरीची शाल

ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील कमी पडणाऱ्या पाण्यासाठी प्रसंगी स्वपक्षीय विरुद्ध लढा देत त्यांनी मुकणे, कडवा, आळंदी, वालदेवी, कश्यपी, गौतमी-गोदावरी, भाम, भावली, वाकी ही धरणाची कामे हाती घेऊन पाठपुरावा करून 500 कोटींचा निधी उपलब्ध करत 15 टी एम सी पाण्याची निर्मिती केली.पश्चिमेचे पाणी खोऱ्यात वळविणे साठी ते 1968 पासून लढा देत होते. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांना कोरोनाने गाठले तरी त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला पळवून लावले होते. वैयक्तिक व राजकीय, सामाजिक जीवनात अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगणारे कोल्हे यांची आज (ता.16 ) रोजी पहाटे प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने राज्याला सहकाराचे धडे देणारे नेतृत्व हरपले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com