राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांची शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्तता

कदम सध्या अण्णाभाऊ साठे महामंडळामधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात आहेत.
Ramesh kadam
Ramesh kadam sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) मोहोळचे (जि. सोलापूर) माजी आमदार रमेश कदम यांची शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्तता करण्यात आली आहे. कदम सध्या अण्णाभाऊ साठे महामंडळामधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात आहेत. (Former MLA of NCP Ramesh Kadam acquitted in abusive case)

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप रमेश कदम यांच्यावर आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी कदम हे तुरुंगात आहेत. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असताना कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसोबत कदम हे शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Ramesh kadam
प्रणितींनी राष्ट्रवादीत वादाची वात पेटवली, पण मुरब्बी दत्तामामांनी विझवली!

पोलिस अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश कदम यांच्या विरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली होती आणि २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप कदम यांनी त्या वेळी केला होता. संबंधित पोलिस अधिकारच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची धमकी दिली होती.

Ramesh kadam
'मी पुन्हा येईन म्हणता, पण आम्ही येऊ द्यायला पाहिजे ना'- शरद पवार

दरम्यान, आघाडी सरकारच्या काळात रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मोहोळ मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचे सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासोबतही वाजले होते. मोहोळमधील उड्डाणपुलाखालील जागेवरून मतभेद झाले होते. कदम यांनी त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम सध्या तुरुंगात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com