जुगार क्लब चालविणारे माजी आमदार रविकांत पाटील यांना अटक

जुगार क्लब चालविणारे माजी आमदार रविकांत पाटील (Ravikant Patil) यांच्यासह एकूण २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
Ravikant Patil

Ravikant Patil

sarkarnama

सोलापूर : होटगी रोड मुलतानी बेकरी जवळील क्लब नाईन या रेस्टोबार मध्ये चालणा-या अवैध जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात आला. यात जुगार क्लब चालविणारे माजी आमदार रविकांत पाटील (Ravikant Patil) यांच्यासह एकूण २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही मोठी कामगिरी बजावली.

गुन्हे शाखेतर्फे (Crime Branch) या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले. लोकांना जुगार अड्डा स्वतः माजी आमदार रविकांत पाटील चालवत असल्याचा आरोप पोलिसांचा आहे. छापा टाकल्याच्या वेळी माजी आमदार रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

हॉटेलमध्ये पोलिस गेल्यानंतर जवळपास 19 जण हे जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून रोख 2 लाख 24 हजार 540 रुपये, 4 लाख 19 हजारांचे मोबाईल, 13 हजारांचे जुगार साहित्य असे एकूण 6 लाख 57 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व 29 आरोपींना रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलिस ठाण्यात बसविण्यात आले होते. रात्री उशीरा सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. माजी आमदार रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलिस ठण्यासमोर मोठी गर्दी केली होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंके हे त्यांचे पथकासह शहरात पेट्रोलींग करीत असताना त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर हद्दीतील मजरेवाडी, आसरा चौक ते होटगीकडे जाणाऱ्या रोडवरील मुलतानी बेकरी समोरील क्लब नाईन रेस्टोबार सोलापूर या ठिकाणी असलेल्या क्लबचे पहिल्या मजल्यावर माजी आमदार रविकांत पाटील हे लोकांना बसण्याची व्यवस्था करून देऊन पैशांवर पैज लावून जुगार खेळवीत आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. यावरुन गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.

<div class="paragraphs"><p>Ravikant Patil</p></div>
आम्ही स्वस्थ बसणार नाही ; शिवसेनेचा कर्नाटक सरकारला इशारा

हॉटेल मध्ये सुरू असलेल्या जुगारमध्ये पैसे ऐवजी कॉइनचा वापर केला जात होता. पैसे काउंटरवर भरून त्याऐवजी कॉइन घेतले जात होते. जुगार मध्ये या कॉइनचा वापर केला जात होता. दहा रुपयांपासून पाचशे रुपये पर्यंतचे कॉइन या ठिकाणी आढळून आले आहेत. पोलिसांनी पाच हजार रुपये किंमतीचे coin जप्त केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com