सोलापूरचे लळीत सरन्यायाधीश झाले अन्‌ आमचा ऊर आनंदाने भरून आला : शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव

जोशी, जमादार, कुंभकोणी आणि लळीत ही चार रत्नं आम्हाला मिळाली, हा मी स्वातंत्र्याचा प्रसादच समजतो. ही चार रत्नं आम्हा सोलापूरकरांसाठी फार महत्वपूर्ण आहेत.
Chief Justice Uday Lalit
Chief Justice Uday Lalit Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : आम्हाला आज अत्यंत आनंद झाला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश (Chief Justice) ही देशातील महत्वाची तीन घटनात्मक पदे आहेत. त्यातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) हे आमच्या सोलापूरचे (solapur) आहेत, या मातीतील आहेत, याचा कोणाला आभिमान वाटणार नाही? आमचा ऊर आज आनंदाने भरून आलेला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी सरन्यायाधीश लळीत यांचे कौतुक केले. (Former Union Home Minister Sushil Kumar Shinde praised Chief Justice Uday Lalit in Solapur)

महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या सोलापूर शाखेच्या वतीने सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता ए. ए. कुंभकोणी, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती एन. जे. जमादार या सोलापूकरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी गृहमंत्री शिंदे यांनी वरील कौतुकाचे उद्‌गार काढले.

Chief Justice Uday Lalit
Andheri By elelction : भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

शिंदे म्हणाले की, लळीत साहेबांनी न्यायदानाच्या क्षेत्रात ज्या काही सुधारणा केल्या आहेत, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आम्हा राजकारणी लोकांना इंटरप्रिटेशन ऑफ लॉ महत्वाचा वाटतो आणि तो सोशल जस्टीसमधला महत्वाचा वाटतो. लळीत साहेब, तुम्ही कामाची सुरुवात फार छान केली, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो.

Chief Justice Uday Lalit
मोठी बातमी : भाजपचा बालेकिल्ल्यातच धुव्वा; फडणवीस-बावनकुळेंच्या जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे यश

लळीतजी, आम्ही सोलापूरची माणसं. पण तुम्ही सोलापूरकरांसाठी इतिहास निर्माण करून गेलात. सोलापूरच्या चार हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला प्राण दिला. जोशी, जमादार, कुंभकोणी आणि लळीत ही चार रत्नं आम्हाला मिळाली, हा मी स्वातंत्र्याचा प्रसादच समजतो. ही चार रत्नं आम्हा सोलापूरकरांसाठी फार महत्वपूर्ण आहेत. अशी संधी पुन्हा कधी मिळेल, याची माहिती नाही. पण मिलिंद थोबडे हे नवा विचार घेऊन आपल्या कौन्सिलमध्ये काम करतात, त्यामुळे ट्रेंड झालेले नवे वकील तयार होतील आणि उद्याच्या पिढीला ते मार्गदर्शन करतील,असा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला.

मिलिंदजी आपण म्हणालात की, खेड्यातून आलेले विशेषतः दलितवर्गीय वकील घाबरतात बिचारे. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. मी चपराशाचा बारमध्ये मेंबर झालो. मीही घाबरत होतो. खरं म्हणजे मी काय आहे, हे दाखवण्यासाठी इंग्रजीमध्ये बोलण्याची इच्छा होती. पण, सोलापूरच्या धगधगत्या मातीतला हुंकार कुठेतरी दिसावा; म्हणून मातृभाषेतच बोलण्याचा प्रयत्न केला, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com