काकांच्या विचारधारेला तिलांजली देणे योग्य वाटले नाही; सत्तेपुढे न झुकता स्वाभिमानाने लढलो...

सातारा जिल्हा बॅंकेच्या Satara Dcc Bank निवडणुकीतील पराभवानंतर ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर Udayasinh Undalkar यांच्या उपस्थितीत मतदारांचा आभार मेळावा झाला.
Udaysinh Undalkar
Udaysinh UndalkarKarad Reporter
Published on
Updated on

कऱ्हाड : लोकनेते विलासकाका पाटील यांनी अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील यांच्यासह सहकाऱ्यांच्या मदतीने जिल्हा बॅंकेचा आर्थिक पाया रचला. विलासकाकांनी शेवटच्या श्वासापर्यंत तत्वाशी तडजोड केली नाही. बऱ्याच जणांनी मला तडजोड करावी, असे सांगितले. मात्र, सत्तेसाठी लाचारी पत्करून काकांच्या विचारधारेला तिलांजली देणं, हे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे मी सत्तेपुढे न झुकता स्वाभीमाने लढलो, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत मतदारांचा आभार मेळावा झाला. यावेळी काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. काटकर, आप्पासाहेब गरुड, कोयना संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, अविनाश नलवडे, शैलेश चव्हाण, हणमंतराव चव्हाण, प्रा. गणपतराव कणसे, उपसभापती रमेश देशमुख, बाजार समिती सभापती महादेव देसाई, खरेदी विक्री संघाचे अध्य़क्ष रंगराव थोरात, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.

Udaysinh Undalkar
जिल्हा बॅंक हे तर निमित्त : शशिकांत शिंदेंचा `कार्यक्रम` करण्याचा मुहूर्त जुनाच !

ॲड. उदयसिंह उंडाळकर म्हणाले, ''ज्या मतदारसंघाचे नेतृत्व काका करत होते. त्या मतदारसंघातील ७० टक्के लोकांची मी निवडणूक लढवावी ही मागणी होती. दुर्दैवाने या निवडणुकीत मला काही मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्याला मी पराभव मानत नाही. मी सर्वसामान्य माणसांच्या जीवावर सत्तेशी झुंज दिली. प्रस्थापितांनाही ही झुंज शक्य झाली नसती. मात्र, रयत संघटनेच्या आणि काँग्रेस पक्षाच्या जीवावर मी झुंज दिली. मी जो वसा आणि वारसा सांगतो, त्याला साजेशे काम करणे मला शक्य झाले याचा मला अभिमान आहे. जिल्हा बॅंकेसाठी मी माझा स्वाभिमान सत्ताधिशांच्या पायाशी ठेवला नाही. काकांना अनेक अडचणी आणण्यात आल्या, कुटुंब अडचणीत आणण्यात आले. त्यावेळीही काकांनी तडजोड केली नाही.

Udaysinh Undalkar
उदयनराजेंचे टेन्शन गेले, शिवेंद्रसिंहराजेंसह सातारा जिल्हा बँकेवर बिनविरोध

त्यासाठी आम्हीही त्यांच्या विचाराशी बांधील आहे. काकांनी उभ्या केलेल्या संस्थांचा आलेख चढता आहे. भविष्यात कऱ्हाड तालक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका येत आहेत. यामध्ये काँग्रेस पक्ष म्हणुन संघटनेतील कार्यकर्ते यांनी जबाबदारीने मागे-पुढे सरकुन निवडणूका लढण्यासाठी तयार व्हा. संघटनेला कुठेही बट्टा लागेल, असे कोणतेही काम कधीही माझ्याकडुन होणार नाही. मनोहर शिंदे यांनी यापुढील निवडणूका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातुन काँग्रेसच्या चिन्हावर लढवु, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com