Nagar News : नगरमध्ये आघाडीला धक्का : एका रात्रीत खेळ पलटला; थोरात-पवारांची काल बैठक अन् आज चार मते फुटली

Bjp News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नाट्यमय घडामोडीनंतर शिवाजी कर्डिले यांची आज निवड झाली.
Ajit Pawar, Balasaheb Thorat News
Ajit Pawar, Balasaheb Thorat NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagar District Bank News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नाट्यमय घडामोडीनंतर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची आज निवड झाली. रात्रीत घडलेल्या घडामोडीनंतर भाजपने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) हातातील जिल्हा बँक ताब्यात घेण्यात यश मिळवले.

जिल्हा बँकेसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संचालकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये आज होणाऱ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून उद्या सकाळी अध्यक्ष पदाचे नाव फायनल केले जाईल, असे पवार यांनी सांगितले होते. मंगळवारी झालेल्या बैठकीला आशुतोष काळे, चंद्रशेखर घुले, अनुराधा नागवडे, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे आदी संचालक उपस्थित होते.

Ajit Pawar, Balasaheb Thorat News
Ahmednagar : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड होताच कर्डिलेंनी सांगितलं विजयाचं गणित

सर्व संचालक मंडळाशी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केली होती. अध्यक्षपदाबाबत संचालकांची मते जाणून घेतली होती. दोन ते तीन नावावर या बैठकीत चर्चाही झाली होती. त्यानुसार आज माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव फायनल झाले. ते अध्यक्षपदासाठी निवडून येणार असे जवळपास निश्चित असताना आघाडीची मते फुटली आणि शिवाजी कर्डिले अध्यक्ष झाले.

त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. पवार आणि थोरात यांनी संचालक मंडळाची काल बैठक घेतली. त्यानंतर आज आघाडीची जवळपास चार मते फुटली. निवडणुकीत कर्डिले यांना 10 मते मिळाली, तर घुले यांना 9 मते मिळाली. एक मत बात झाले. त्यानुसार कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जिल्हा सहनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेशपुरी यांनी जाहीर केले.

Ajit Pawar, Balasaheb Thorat News
विखेंनी केला थोरातांचा करेक्ट कार्यक्रम ; फडणवीसांचा फोन अन् नगर जिल्हा बॅंक भाजपच्या ताब्यात : रात्रीत काय झाले?

महाविकास आघाडीचे 14 संचालक होते. तर भाजपचे चार आणि त्यांना माननारे दोन असे एकून सहा संचालक होते. महाविकास आघाडीचे उमेदवार घुले यांना 9 मते पडली. त्यामुळे आघाडीची चार मते फुटली. या मतांमुळे कर्डिले यांचा विजय झाला. अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीनंतर सूत्र फिरली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यानंतर निवडणूक लढवण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या आणि महाविकास आघाडीला विजयाची खात्री असतानाच भाजपने बाजी मारली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com