श्रीनिवास पाटलांच्या भुईमुगाच्या शेगांची गडकरींना भुरळ

मंत्री नितीन गडकरी यांनी शेंगा मीठ टाकुन पॅक करुन द्या, मी खायला घेवुन जातो, असे सांगुन ते शेंगा घेऊन विमानतळाकडे रवाना झाले.
MP Shrinivas Patil, Nitin Gadkari
MP Shrinivas Patil, Nitin Gadkarikarad
Published on
Updated on

कऱ्हाड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. सकाळी त्यांचा दौरा सुरु होण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यांचे दिवसभरातील कार्यक्रम अटोपते घ्यावे लागले. दरम्यान, सर्व कार्यक्रम संपवुन विमातनळावर परताना मंत्री गडकरी यांनी त्यांच्या व्यस्त शेड्युलमधुन वेळ काढुन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्यांचा पाहुणचार स्विकारुन उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा घेवुन गेले.

सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर जिल्ह्यातील विविध महामार्गांचे उद्घाटन, भुमिपुजन, कृष्णा हॉस्पीटलमधील कोरोना योध्द्यांचा सत्कार, जनकल्याण पतसंस्थेचा पुरस्कार वितरण कार्यक्रम, श्रीकृष्ण व्हॅलीतील सहा लाखांच्या घरांचे चाव्या वाटप या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आज कऱ्हाडच्या दौऱ्यावर आले होते. मात्र त्यांच्या दौरा नियोजीत वेळेपेक्षा लांबला. त्यांना सायंकाळी कऱ्हाडवहुन पुण्याला आणि तेथुन जम्मू काश्मीरमधील श्रीनगरला जायचे असल्याने काही कार्यक्रम अटोपते घ्यावे लागले.

दिवसभराच्या कार्यक्रमाचे बिझी शेड्युल असतनाही मंत्री गडकरी यांनी फर्न हॉटेलमधील कार्यक्रम संपवुन विमानतळाकडे रवाना होण्यापुर्वी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गोटेतील निवासस्थानी भेट दिली. खासदार पाटील, रजनीदेवी पाटील, सारंग पाटील यांनी मंत्री गडकरी यांचे स्वागत करुन त्यांना पाहुणचार दिला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार शिवाजीराव नाईक, कृषीभुषण सुधीर चिवटे आदी उपस्थित होते. त्यानंतर मंत्री गडकरी यांना शेंगा खायला देण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी शेंगा मीठ टाकुन पॅक करुन द्या, मी खायला घेवुन जातो असे सांगुन ते शेंगा घेऊन विमानतळाकडे रवाना झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com