Dhangar Reservation Protest : धनगर आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार; गिरीश महाजनांची मोठी माहिती

Girish Mahajan Visit Chaundi : चौंडीतील धनगर उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची केली विचारपूस
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे धनगर समाज आरक्षण आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. येत्या दोन दिवसांत याबाबत काय निर्णय घेता येईल, यावर मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी नगरमध्ये दिली. महाजनांच्या शब्दामुळे आता धनगर समाजाबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे राज्याचे लक्ष आहे. (Latest Political News)

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी येथे मागील ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यातील अण्णासाहेब रुपनवर या उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात जाऊन रुपनवर यांची मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Girish Mahajan
Devendra Fadnavis In Nagpur : देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी समाजाला शब्द; 'कुठल्याही परिस्थितीत आरक्षणात नवे वाटकरी होणार नाहीत'

महाजन म्हणाले, 'उपोषणकर्ते रुपनवर यांची प्रकृती ठीक आहे. गेली अकरा दिवस उपोषण केल्याने त्यांच्या वजनात मोठी घट झाली आहे. मात्र, त्यांचा वैद्यकीय अहवाल ठीक आला आहे. त्यांना उपोषण सोडावे, ही विनंती केलेली आहे. तसेच चौंडी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहे,' असे महाजनांनी स्पष्ट केले. (Maharashtra Political News)

'धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना हा मुद्दा आपण पुढे नेला आहे. आता तांत्रिक अडचणी दूर होत आल्या आहेत. लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेत यावर चर्चा केली जाईल. चर्चेतून मार्ग निघत असतो म्हणून आम्ही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा करू,' असेही महाजनांनी या वेळी सांगितले. 'दोन दिवसांपूर्वीच मी या ठिकाणी येणार होतो. मात्र, जालन्यातील उपोषणामुळे मला येण्यास विलंब झाला. आता धनगर आरक्षणाबाबत येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय तो निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पालकमंत्र्यांचे माहीत नाही!

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्यापही चौंडी येथे जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. याबाबत मंत्री महाजन यांना छेडण्यात आले. यावर महाजन म्हणाले, 'विखे आले की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, मला वाटले की त्यांनी भेट घेतली असेल,' असे सांगून महाजनांनी यावर अधिक भाष्य टाळले.

(Edited by Sunil Dhumal)

Girish Mahajan
Malegaon Road Issue : काय सांगता ! मालेगावमधील दीड कोटींचा रस्ता चक्क हरवला; दुर्बिणीतून शोधाशोध सुरू...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com