

Gokul News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत महायुतीने एकत्र लढण्यावर अखेर शिक्कामोर्तब केले आहे. शनिवारी (30 मे ) कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच एकत्रित लढवायची, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. शिवाय "झालं गेलं पंचगंगेला मिळालं", असं म्हणत महायुतीच्या पॅनेलच्या नावाचीही घोषणा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक, जनसुराज्य पक्षीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासह महायुतीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मागील अनेक दिवसांपासून महायुतीत आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हानांचा खेळ रंगला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला असून महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्यावर एकमत झाले. फडणवीस यांच्याच सूचनेनुसार महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यात सर्व घटक पक्ष मिळून पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला.
या बैठकीनंतर बोलताना जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे म्हणाले, ही बैठक अतिशय सकारात्मक वातावरणात झाली. महायुतीचे सर्व घटक पक्ष गोकुळची निवडणूक छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ह्या नावाने लढवणार आहेत. जागावाटप आणि निवडणुकीसंदर्भातील पुढील रणनीती वेळोवेळी बैठक घेऊन ठरवण्यात येणार आहे. शिवाय जागा वाटपाचा निर्णय देखील एकत्रितपणे घेणार असल्याची माहिती देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.