

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. येत्या 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्यावी, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या या निकालामुळे गोकुळची निवडणूक प्रकिया या आठवड्यात पुन्हा सुरु होणार आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाच्या विरोधात राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून हे आदेश दिले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. गोकुळ दूध संघातील 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दूध संघाची निवडणूक घ्यावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले होते.
त्या संदर्भात आजाऱ्यातील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे आणि तामगाव मधील एका दूध संस्थे कोल्हापूर सर्किट बेंचं मध्ये धाव घेतली होती. सर्किट बँकेच्या या आदेशाला आव्हान देण्यासाठी श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी त्याबाबत खंडपीठासमोर सुनावणी झाली.
गोकुळ दूध संघाच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी, आनंद लांडगे, भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. तर श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेच्या वतीने वरिष्ठ वकील मुकुल रोहितगी यांनी बाजू मांडली. महादेव दूध संस्थेच्या वतीने वकील तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने ऍड. धर्माधिकारी यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आणि निकाल राखून ठेवला होता. आज त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आला.
न्यायालयाच्या या निकालामुळे गेले अनेक दिवस गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान सहा महिने पुढे जावी या अनुषंगाने प्रयत्न करणाऱ्या अदृश्य शक्तीला दणका बसला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर या 1308 दूध संस्थांची सुनावणी किमान महिनाभरात पूर्ण करावी लागणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे. श्री स्वामी समर्थ दूध व्यवसायिक संस्था, मर्या पुंगाव यांनी दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालय येथे उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली होती.
सदर प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने सर्किट बेंच कोल्हापूर यांचा आदेश रद्द करत कोल्हापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेतील अडथळे दूर झाले असून, आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणात श्री स्वामी समर्थ दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. तर गोकुळ दूध संघाच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी, अॅड. आनंद लांडगे व अॅड. भूषण मंडलिक यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीला गती मिळणार असून, संबंधित घटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.