चव्हाणांसाठी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार झालेले गोरे आज समोरासमोर येऊन बोललेही नाही

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या सर्वात जवळचे सहकारी म्हणूनच गोरेंकडे त्यावेळी पाहिले जात होते.
Prithviraj Chavan & Jaykumar Gore Latest News
Prithviraj Chavan & Jaykumar Gore Latest NewsSarkarnama

गोंदवले : एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासाठी आपले राजकीय भवितव्य पणाला लावण्यासाठी तयार झालेले आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Ghore) व चव्हाण आज आमनेसामने येऊनही दोघांनी एकमेकांना ओळखही दाखवली नाही.आझादी गौरव यात्रेनिमित्त माजी मुख्यमंत्री चव्हाण गोंदवल्यात आले असताना योगायोगाने आ.गोरेचे वाहन ट्रॅफिक मध्ये अडकल्याने पूर्वाश्रमीचे हे गुरू-शिष्य एकमेकांसमोर आले होते.मात्र राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोरच दोघांचा घडलेला हा अबोला तालुकाभर चर्चेचा बनलाय. (Prithviraj Chavan & Jaykumar Gore Latest News)

Prithviraj Chavan & Jaykumar Gore Latest News
मेंटेंबद्दल बोलताना सदाभाऊंना अश्रू अनावर

राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते असताना आमदार जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदाच २००९ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवून विजय मिळविला होता.त्यांच्या या विजयामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे माणमधील प्राबल्य वाढल्याचे मानले जात होते.या निवडणुकीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली होती.परंतु चव्हाण यांना विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्यत्व नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सुरक्षित असलेल्या माण मधून निवडणूक लढवावी असा कार्यकत्यांसह गोरेंचा सूर होता. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन माणची जागा रिकामी करण्याचे धाडसी वक्तव्य केल्याने गोरेनी काँग्रेसवासीयांसह मुख्यमंत्री चव्हाणांचा विश्वास वाढवला होता.

Prithviraj Chavan & Jaykumar Gore Latest News
Vinayak Mete|मेटेंना कोणी आणि कशासाठी बोलवलंं होंत? सावंतानी व्यक्त केली शंका

मुख्यमंत्री चव्हाणांबाबतचा हा पेच नंतर सुटला होता.परंतु आपल्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय भवितव्य पणाला लावण्यास तयार झालेले आ.गोरे मुख्यमंत्री चव्हाणांच्या गळ्यातील जणू ताईतच बनले होते.या संधीचे सोने करत आ गोरेंनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामेही खेचून आणली होती.अनेक वर्षे रखडलेला उरमोडी प्रकल्पही याच काळात पूर्ण करून माणमध्ये पाणी आणण्यात आ गोरेंनी यश मिळवले होते.मुख्यमंत्री चव्हाण यांच्या सर्वात जवळचे व विश्वासाचे सहकारी म्हणूनच गोरेंकडे त्यावेळी पाहिले जात होते.

२०१४ च्या निवडणुकीतही काँग्रेसमधून आमदार गोरेंनी बाजी मारली होती. त्यानंतरच्या काळात बरेचसे पाणी पुलाखालून गेले अन आमदार गोरेंनी काँग्रेसला रामराम करून २०१९ ची निवडणुक भाजपातून लढवली व जिंकली.सध्या भाजपावासीय असलेले आमदार गोरे हे पक्षीय कारणाने माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यापासून दुरावले असल्याचे आज पाहायला मिळाले.योगायोगाने आ चव्हाण व आ गोरे एकमेकांच्या समोर आले होते.

Prithviraj Chavan & Jaykumar Gore Latest News
मेटेंचे मराठा आरक्षण, शिवस्मारकाचे स्वप्न सरकार पूर्ण करेल का?

राष्ट्रीय काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा आज गोंदवल्यात आली होती.या पदयात्रेनिमित्तची सभा आटोपल्यानंतर माजी मुख्यमंत्री चव्हाण हे आपल्या वाहनाकडे जात असताना जवळच आमदार गोरेंचे वाहन ट्रॅफिकमध्ये अडकले होते.या दरम्यान आ चव्हाण व आ गोरे यांच्यामध्ये अवघ्या काही फुटाचेच अंतर होते.मात्र तरीही एके काळी घनिष्ठ संबंध असलेल्या या नेत्यांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.चव्हाण - गोरे समोरासमोर आल्याने पुढे काय घडणार ?याची उत्सुकता असतानाच हे नेते एकमेकांना न भेटताच निघून गेले.काँग्रेसचे जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समोरच हा प्रकार घडला.या न झालेल्या भेटीचा विषय मात्र सर्वत्र चर्चेचा बनला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com