कल्याणराव काळेंना राष्ट्रवादी प्रवेश लाभला : ‘सहकार शिरोमणी’च्या कर्जाची सरकारने घेतली हमी

गाळप हंगामाच्या तोंडावर या साखर कारखान्याच्या पुढे असलेला आर्थिक प्रश्‍न आता मार्गी लागला आहे.
kalyanrao kale
kalyanrao kaleSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे कल्याणराव काळे यांच्या पथ्यावर पडले आहे. कारण, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ विभागाने आज (ता. ४ ऑक्टोबर) पंढरपूर तालुक्‍यातील चंद्रभागानगर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला १८ कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी शासन हमी दिली आहे. त्यामुळे आगामी ऊस गाळप हंगामाच्या तोंडावर या साखर कारखान्याच्या पुढे असलेला आर्थिक प्रश्‍न आता मार्गी लागला आहे. (Government guarantee for 18 crore loan of Sahakar Shiromani sugar factory)

दरम्यान, काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याच्या कर्जालाही सरकारने शासन हमी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्यातील सत्तेचा फायदा झाला आहे.

kalyanrao kale
चक्क झेडपीच्या अध्यक्षांनीच मागितली टक्केवारी : कृषी सभापतींचा आरोप

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांनी पोटनिवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्या प्रवेशानंतर काळे यांना राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा लाभ मिळाल्याचे समोर आले आहे.

kalyanrao kale
राष्ट्रवादीने खाते उघडले; पण भाजपने जाणकरांचा अंदाज चुकवत पॅनेल दिला!

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्‍यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला १० कोटी रुपये आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला १८ कोटी रुपये अशा एकूण २८ कोटी रुपये व त्यावरील व्याजासाठी पूर्वहंगामी अल्पमुदत कर्ज बॅंकांकडून घेण्यास शासन हमी देण्यात आली आहे. एक वर्षासाठी सरकरने ही हमी घेतली आहे. या दोन्ही साखर कारखान्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील पूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रकही कारखान्याला करार पत्रकात नमूद करावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com