Ramesh Bais on Satara Tour : राज्यपाल आठवडाभर महाबळेश्वर दौऱ्यावर; काय आहे परंपरा ?

Mahabaleshwar : पोलिसांनी घेतला सुरक्षिततेच्या दृष्टीने निवास्थानाचा आढावा
Mahabaleshwar Rajbhavan
Mahabaleshwar RajbhavanSarkarnama
Published on
Updated on

Ramesh Bais News : राज्यपाल रमेश बैस हे १० मे पासून १७ मे पर्यंत सात दिवस महाबळेश्‍वर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा राजभवन महाबळेश्वर येथेच मुक्काम असेल.

उन्हाळी हंगामात राज्यपालांची आपल्या कुटुंबीय व लवाजम्यासह महाबळेश्वर येथे येण्याची ब्रिटिशकाळापासून प्रथा आहे. याआधी देखील अनेक राज्यपाल हे उन्हाळी हंगामामध्ये चार-पाच दिवसांसाठी महाबळेश्वर मुक्कामी येत होते.

Mahabaleshwar Rajbhavan
Uddhav Thackeray : गोगावल्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा हल्लाबोल; भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडणारच

याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsigh Koshyari) येथे दोन वेळा आले होते. आता राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) हे पहिल्यांदाच महाबळेश्वर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे राजभवन परिसरासह निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या राज्यपाल निवासस्थानाला नवी झळाळी मिळाली आहे.

Mahabaleshwar Rajbhavan
Aditya Thackeray News : पुण्यातील वेताळ टेकडीसाठी आदित्य ठाकरे मैदानात; म्हणाले टेकडीचा बळी...

राज्यपाल मुक्कामी असणाऱ्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील निवास्थान व परिसराचा पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली. तसेच तेथील व्यवस्थेचा आढावा घेताल. राज्यपाल बैस हे किल्ले प्रतापगडसह बेल एअर रुग्णालय पांचगणी, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, प्रसिध्द ॲार्थरसिट पाॅईंट आदी ठिकाणी भेटी देणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com