उपसरपंचाने उसने पैसे न दिल्याने ग्रामपंचायत सदस्याने विषारी औषध प्यायले...

बऱ्याच वेळा चुकीचे आर्थिक व्यवहार हेच आत्महत्येचे कारण ठरतात.
Crime
CrimeSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - बऱ्याच वेळा चुकीचे आर्थिक व्यवहार हेच आत्महत्येचे कारण ठरतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार काळजीने होणे आवश्यक असतात. असाच एक प्रकार निंबळक ( ता. नगर ) मध्ये घडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. ( Gram Panchayat member drank poisonous drug as sub-panchayat did not pay him ... )

निंबळक ग्रामपंचायतचे माजी सदस्य गणेश कोतकर यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी संदीप कोतकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निंबळकचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला आहे.

Crime
त्या नेत्याने आपल्या एकुलत्या एक मरणासन्न मुलाचे ऑक्सिजन काढून घेतले

फिर्यादीत म्हंटले आहे की, उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांनी गणेश कोतकर यांची चार लाख रूपये उसणे दिले होते. त्यांनी आठ महिन्यापूर्वी बाळासाहेब कोतकर यांना आठ दिवसांच्या बोलीवर हॉटेल सार्थक येथे राजेंद्र कोतकर व सदाशिव रोहकले यांच्या समक्ष चार लाख रुपये उसनवारीवर दिले होते. मयत गणेश यांनी वेळोवेळी कोतकर यांना पैसे मागुन ही दिले नाहीत.

Crime
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

बाळासाहेब कोतकर यांना पैसे दिल्याबाबत विचारणा केली असता पैसे घेतले असल्याचे कबूल केले होते. मी चार दिवसांनी देणार असल्याचे मला सांगितले. माझा भाऊ गणेश हा कोतकर यांच्याकडे वेळोवेळी पैसे मागतच होता. परंतु कोतकर यांनी काही ना काही कारण सांगुन पैसे देण्यास टाळा टाळ करत होता. माझा भाऊ गणेश हा काही दिवसांपासून मानसिक तणावात आहे. तो जिवाचे काही बरे वाईट करून घेईल तुम्ही त्यांचे घेतलेल चार लाख रुपये परत देऊन टाका. त्याचे कुटुंब ताणतणावाखाली आहे. असे मी कोतकरला सांगितले होते. पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे गणेश यांनी विषारी औषध घेतले. उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गणेश हा मयत झाल्याचे आम्हाला सांगितले, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com