अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्याची विनंती केली आहे. हसन मुश्रीफ हे आज एका कार्यक्रमा निमित्त अकोले ( जि. अहमदनगर ) येथे आले असता त्यांना पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता त्यांनी या बाबत खुलासा केला. Hasan Mushrif said, ... so I don't want the post of Guardian Minister of Ahmednagar
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यातील विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत निवडणुकांचा व्याप पाहता प्रत्येक मंत्र्याकडे एकाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असावे अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी मी माझी बाजू मांडली. कोल्हापूर व अहमदनगर अशा दोन्ही जिल्ह्यातील विधान परिषद, जिल्हा परिषद, बाजार समित्या, पंचायत समित्यांची निवडणूक आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांचीही निवडणूक जवळ आली आहे.
ते पुढे म्हणाले, दोन जिल्ह्यांना एक पालकमंत्री असल्यास त्याला दोन्हींकडे लक्ष देणे कठीण होईल. त्यामुळे एका मंत्र्याने जबाबदारी उचलावी. असे सूचविले गेले. म्हणून मीही अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदावरून मुक्त करावे. कोल्हापूर व अहमदनगर अशा दोन्ही जिल्ह्यांकडे लक्ष देणे कठीण होईल. असे पक्ष श्रेष्ठींना कळविले आहे. पुढील निर्णय पक्ष श्रेष्ठींना घ्यायचा आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
त्यांनी 40 वर्षांत काय केले
कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले मात्र अकोले येथील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव तसाच पडून या आहे. या बाबत पत्रकारांनी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी याबाबत मागणी केली आहे. आराखडा टाकला आहे. हा प्रश्न तुम्ही 40 वर्षे सत्तेत असलेल्यांना विचारायला हवा होता, असे म्हणत मुश्रीफांनी नाव न घेता मधुकरराव पिचडांवर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.