हसन मुश्रीफ म्हणाले, ही तर भाजपची सहकार परिषद...

हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी सहकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपवर ( BJP ) टीका केली.
 Hasan Mushrif

Hasan Mushrif

Sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे सहकार परिषद झाली. मात्र या सहकार परिषदेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. नगर पंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ काल ( शनिवारी ) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. अहमदनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी सहकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपवर ( BJP ) टीका केली. Hasan Mushrif said, this is BJP's Sahakar Parishad...

हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवरानगर (ता. राहाता) येथे झालेली सहकार परिषद ही भारतीय जनता पक्षाची सहकार परिषद आहे. सहकार हा प्रामुख्याने राज्य सरकारचा विषय आहे. केंद्राचा सहकार हा मल्टिस्टेट संस्थांना लागू होतो. मल्टिस्टेटचा कायदा जाचक आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेविरोधी आहे. आम्हाला या सहकार परिषदेला बोलाविले असते, तर मल्टिस्टेट कायद्यातील जाचक अटींबद्दल केंद्रीय सहकारमंत्र्यांना सांगितले असते, अशी खोचक टीका मुश्रीफ यांनी केली.

<div class="paragraphs"><p> Hasan Mushrif </p></div>
हसन मुश्रीफ म्हणाले, नीलेश लंके राज्यातील उमलते नेतृत्त्व...

जिल्ह्यातील कोरोनाचा आणि संभाव्य ओमिक्रॉनच्या लाटेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रवरानगरला झालेला कार्यक्रम हा सहकार परिषदेचा नव्हता, तर तो भाजपचा मेळावा होता. सहकारातील नामांकीत व्यक्‍तींना त्यासाठी बोलाविले नाही. पालकमंत्री असूनही आपणास निमंत्रण नाही.

<div class="paragraphs"><p> Hasan Mushrif </p></div>
हसन मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे शीट, विखेंकडे बॅलन्स...

शहा आणि माझा दौरा योगायोग

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांचा दौरा असताना पालकमंत्र्यांनी अहमदनगरला बैठक घेत प्रशासनाला तिकडे जाऊ दिले नाही, असा मुद्दा उपस्थित केला असता, हा निव्वळ योगायोग आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा आणि तीन नगरपंचायतींच्या प्रचारासाठी आपण आलो आहोत. 20 तारखेला कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी उमेदवारी माघारीचा दिवस असल्याने, त्यानंतर जिल्ह्यात दौरा करणे शक्‍य नव्हते. यामुळेच शनिवारी आल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com