भाजपमध्ये निष्ठावंत्यांची उपेक्षा, पक्षांतर करून आलेल्यांचा सन्मान; तालुकाध्यक्षांची खंत

BJP |Satara Politics| मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जात आहे.
Mandar Joshi| Satara
Mandar Joshi| Satara

वडूज : भारतीय जनता पक्षात पक्षांतर करून आलेल्यांना मोठा सन्मान दिला जात आहे. तर संघ संस्कारातून पक्षाशी एकनिष्ठ राहीलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा होत असल्याची खंत सिध्देश्वर कुरोली (ता.खटाव) येथील भारतीय जनता पक्षा (BJP) युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष मंदार जोशी यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत जोशी म्हणाले की, भाजपमध्ये सद्या पक्षांतर करून आलेल्यांना सन्मानाने खुर्च्या दिल्या जात आहेत. तर संघ संस्कारातून कार्यरत राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उपेक्षित ठेवले जात आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जात आहे. खासदार नाईक निंबाळकर यांनी देखील खासदार झाल्यापासून खटाव, माण तालुक्यातील निष्ठावंतांशी कधी संपर्क केला नाही की गाठी भेटी घेतल्या नाहीत. या कार्यकर्त्यांच्या मनोभावना काय आहेत ? त्यांच्या अडचणी काय आहेत ? वैयक्तिक नव्हे तर सार्वजनिक कामाबद्दलही त्यांनी कधी विचारपूसही केली नाही.

Mandar Joshi| Satara
bjp-congress| फडणवीस-चव्हाण भेटीवर मुख्यमंत्री शिंदेंचे सूचक वक्तव्य

वास्तविक हे कार्यकर्ते तळागाळातून आलेले आहेत. त्यांच्याकडे या भागातील समस्यांची माहिती असू शकते. त्यांच्याही काही स्थानिक अडचणी असू शकतात. पक्षाचे या भागाचे खासदार, आमदार अशा निष्ठावंतांशी कधी संपर्क करत नाहीत. निवडणुकीच्या काळात एखादी दुसरी बैठक घेण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. निवडणूक काळात खरेतर व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता हे निष्ठावंत कार्यकर्ते जीव तोडून पक्षासाठी काम करतात. अशा कार्यकर्त्यांची उपेक्षा होत आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशी सतत उपेक्षा होत असेल तर त्यांनी निष्ठा तरी का दाखवावी असा प्रश्न निर्माण होत आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री सोमप्रकाश हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिले गेले नाही. जिल्हाध्यक्षांनी इतर तालुक्यात संबंधित मंत्र्यांचे कार्यक्रम घेतले, मग खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी एखादी बैठक का घेतली नाही हा प्रश्न देखील निर्माण होत आहे. तसेच पक्षाने दिलेले किती कार्यक्रम त्यांनी राबविले याचाही संबंधितांनी विचार करावा. निष्ठावंत कार्यकर्त्यांची होणारी उपेक्षा ते फार काळ सहन करतील ही अपेक्षा ठेवू नये असेही जोशी यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com