Maan NCP News : मोदींनी तुमच्या प्रश्नांकडे किती लक्ष दिले : शरद पवारांचा माणच्या जनतेला सवाल

Sharad Pawar दहिवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शरद पवार बोलत होते
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra Modisarkarnama
Published on: 
Updated on: 

-रुपेश कदम

Maan NCP News : ज्यांच्या हातात आज राज्यातील व केंद्राची सत्ता आहे, त्यांना दुष्काळी भागातील प्रश्नाची जाण नाही. संकटग्रस्त लोकांना दिलासा देणं ही त्यांची जबाबदारी असून ते त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत. त्यासाठी या तालुक्याचे व जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या विचाराची माणसं असावित. मोदींनी तुमच्या प्रश्नांकडे किती लक्ष दिले, असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, माण-खटाववर पुन्हा संकट आलंय यापार्श्वभूमीवर तुमची माहिती घ्यावी, तुमच्याशी बोलावं, तुम्हाला मदत करावी या हेतूने मी इथं आलो असे त्यांनी स्पष्ट केले.

दहिवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शरद पवार Sharad Pawar बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, रोहित पवार, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, डॉ. सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने दडी मारली. पेरण्या झाल्या पण दुबार पेरणीचं संकट आलं. माण-खटाव वर पुन्हा संकट आलं. तुमची माहिती घ्यावी तुमच्याशी बोलावं तुम्हाला मदत करावी या हेतूने मी इथं आलो. खरा प्रश्न पाण्याचा आहे. दुर्दैवाने वेगळे चित्र आहे. तुम्ही मला देशाच्या लोकसभेत पाठवलं. त्यावेळी सुध्दा दुष्काळी स्थिती होती.

पण, मी चारा छावण्या दिल्या, पाण्याचे टँकर देवून त्यातून बाहेर काढण्याचं प्रयत्न केला. माण तालुक्याने सदाशिवराव पोळ यांच्या पाठीशी शक्ती उभी केली. यशवंतराव चव्हाणांच्या पाठीशी माण तालुका कायम राहिला हे ऋण आम्ही कधी विसरु शकत नाही. आमचं कर्तव्य आहे इथल्या लोकांच्या पाठीशी राहणं अन्‌ इथले प्रश्न सोडविणे.

Sharad Pawar, Narendra Modi
Maan Political News : दहिवडी नगरपंचायत इमारतीचा श्रेयवाद पेटला; शरद पवारांआधी भाजपने केले तृतीयपंथींच्या हस्ते उद्‌घाटन

आज ज्यांच्या हातात राज्य व केंद्राची स्थिती आहे त्यांना या प्रश्नाची किती जाण आहे. त्यांची जबाबदारी आहे, संकटग्रस्त लोकांना दिलासा देणं. पण त्यांच्याकडे हे डुंकूनही पाहत नाहीत. मोदींनी तुमच्या प्रश्नांकडे किती लक्ष दिले, असा प्रश्न करून श्री. पवार म्हणाले, त्यामुळे माण तालुक्याचे व जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या विचाराची माणसं असावीत.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com