मला वाटत लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हा बोगसपणा!

भाजपचे ( BJP ) खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांचे कोरोना लॉकडाउन बाबतचे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आले आहे.
Dr. Sujay Vikhe Patil

Dr. Sujay Vikhe Patil

Sarkarnama

Published on
Updated on

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या केवळ 26 असली तरी जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते कोरोना बाधित आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे ( BJP ) खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांचे कोरोना लॉकडाउन बाबतचे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आले आहे. I think lockdown night curfew is bogus

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेले मंत्री व आमदार कोरोना बाधित आढळून येत आहेत. अशाच अहमदनगर जिल्ह्यात राहणारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोरोना बाधित आढळून आले आहेत. काल पर्यंत त्यांचा मोठा जनसंपर्क होता.

<div class="paragraphs"><p>Dr. Sujay Vikhe Patil</p></div>
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सामान्यांची काळजी करा, तुरुंगात गेलेल्यांची नको...

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्य सरकारकडून कडक निर्बंध लावण्याच्या हलचालींना वेग आला आहे. अशातच डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारने कोणालाही कोविड काळात दंड करू नये. लग्न समारंभ हे होत राहतील. कितीही गर्दीची मर्यादा आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी लोक येतात. लोकांचं प्रेम तेवढं असतं. पण लोकांनी लग्नाला आल्यावर स्वतःहून कोरोनाचे निर्बंध पाळणे आवश्यक आहे. मास्क घालावे. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत.

खासदार डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, आपण प्रत्येक वेळी लोकांवर निर्बंध टाकू शकत नाही. मग माणसानं जगायचं कसं? लग्न समारंभावर निर्बंध आणताना आपण हा विचार करत नाही की, या लग्न समारंभामुळे उपजिविका करणारे किती लोक होते. बँडवाले, लाईटवाले, मंडपवाले त्यांनाही मुलंबाळं आहेत. उद्या जर लॉकडाउन लागलं गेलं तर त्यांच्या मुलाबाळांना कोण खाऊ घालणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

<div class="paragraphs"><p>Dr. Sujay Vikhe Patil</p></div>
सुजय विखे म्हणाले, अजित पवारांच्या आदेशानेच नगर जिल्ह्यातील गावांत लॉकडाऊन

त्यांनी सांगितले की, मला वाटतं लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हा बोगसपणा आहे. याची काहीही अवश्यकता नाही. सर्वांनी स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारून सुरक्षित राहणे आणि कोरोना लसीकरण घेणे हाच एकमेव उपाय आहे. बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे मी समर्थन करत नाही. दोन वर्षांपासून देशात कोरोना संकटकाळ आहे. आता लोकांनी कोरोना बरोबर जगायला शिकलं पाहिजे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com