...म्हणून विश्वराजने अमेरिकेतच राहावे, अशी माझी इच्छा होती : महाडिकांनी बोलून दाखवली मनातील गोष्ट

एक कोटीचं पॅकेज इथं कुठं मिळणार आहे?
Dhananjay Mahadik-Vishwaraj Mahadik
Dhananjay Mahadik-Vishwaraj MahadikSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima sugar Factory) निवडणुकीत विश्वराज महाडिक (Vishwaraj Mahadik) महत्वाचा फॅक्टर ठरला आहे. विश्वराज याने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्याला एक कोटीचं पॅकेज मिळालं होतं. ते पाहता तो परत भारतात येईल की नाही, अशी शंका माझ्या मनात होती. कारण माझीही स्वतःची तशी इच्छा नव्हती. कारण एक कोटीचं पॅकेज इथं कुठं मिळणार आहे, त्यामुळे विश्वराज याने तिकडचं राहावं, अशी माझी इच्छा होती, असे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आज प्रथमच सांगितले. (I wanted Vishwaraj Mahadik to stay in America : Dhananjay Mahadik)

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्य केलेल्या पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यातील नेते मंडळींचा सन्मान व नूतन संचालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात महाडिक बोलत होते.

Dhananjay Mahadik-Vishwaraj Mahadik
‘भीमा’च्या निवडणुकीबाबत परिचारकांनी फडणवीसांना ‘हा’ शब्द दिला होता : महाडिकांनी सांगितली इनसाईड स्टोरी

महाडिक म्हणाले की, भीमा कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी काही दिवसांपासून अपप्रचाराचे वावटळ उठवले होते. त्यांना अपेक्षित होतं की त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. मात्र, ते जे जे बोलले, ते सर्व खोटे होतं. अपप्रचार होता, टीकाही खालच्या पातळीवर करण्यात आलेली होती.

Dhananjay Mahadik-Vishwaraj Mahadik
गुवाहाटीत झालेल्या राजकीय स्फोटाची बत्ती आमदार राऊतांनी बार्शीतून पेटवली : कल्याणशेट्टींचा सत्तापालटाबाबत गौप्यस्फोट

भीमा कारखाना निवडणुकीचा सर्वांत महत्वाचा फॅक्टर हा विश्वराज धनंजय महाडिक हा आहे. मी काल मुलाखतीत सांगितलं की, विश्वराज महाडिक यांनी अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांना एक कोटीचं पॅकेज मिळालं हेातं. ते पाहता तो परत भारतात येईल की नाही, अशी शंका माझ्या मनात होती. कारण माझी स्वतःची तशी इच्छा नव्हती. कारण एक कोटीचं पॅकेज इथं कुठं मिळणार आहे, त्यामुळे माझी इच्छा होती, विश्वराज याने तिकडचं राहावं. मला वाटलं आता भारतात आला आहे, तर कोल्हापुरात किंवा मुंबईत छोटा-मोठा उद्योग सुरू करेल. पण तो थेट पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आला. बॉस्टन टू मोहोळ-पंढरपूर हा त्यांचा प्रवास मला कौतुकास्पद वाटतो, अशा शब्दांत खासदारांनी आपल्या मुलाचे कौतुकही केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com