Vijay Ghadge : अजितदादांनी भेट न दिल्यास....; छावा संघटनेच्या विजय घाडगेंनी सांगितला पुढचा प्लॅन

Chhawa Sanghatana News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते फेकणारे छावा संघटनेचे विजय घाडगे यांना राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली होती.
Vijay Ghadge
Vijay GhadgeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 July : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूरज चव्हाण यांनी मला का मारहाण केली, याचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी जात आहे. अजितदादांनी मला भेट न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटणार आहे, असे छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी सांगितले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ लातूर येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यापुढे पत्ते फेकणारे छावा संघटनेचे विजय घाडगे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्या मारहाणीत घाडगे हे जखमी झाले आहेत. काही दिवसांच्या उपचारानंतर घाडगे हे ॲम्ब्युलन्समधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

तुळजापुरातून मुंबईकडे जाताना सोलापूर येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विजय घाडगे (Vijay Ghadge) पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना घाडगे यांनी अजित पवार यांच्या भेटीला जाण्याचे प्रयोजन सांगितले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी मुंबईत अजित पवारांच्या बंगल्यावर धडकणार आहेत. विजय घाडगे पाटील यांच्यासोबत छावा संघटनेचे पदाधिकारी वाहनांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर झालेला हल्ला हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं कटकारस्थान आहे, असा गंभीर आरोप विजय घाडगे यांनी केला आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विजय घाडगे म्हणाले, अजित पवार यांनी भेट न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटण्याचा निर्धार घाडगे पाटील यांनी बोलून दाखवला. मला मारहाण का करण्यात आलीख याचे उत्तर अजितदादांनी दिलं पाहिजे. कृषिमंत्रीपद हे मुख्यमंत्रिपदापेक्षा श्रेष्ठ आहे, कृषिमंत्र्यांना त्यांच्या पदाची गरिमा माहिती नाही.

मला जर पोलिसांनी अडवलं, तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरून त्यांचा कोण गुंड आहे, चव्हाण यांच्या टोळीने मला येऊन मारहाण केली. सुरज चव्हाण पोलिस स्टेशनला येतो आणि पंधरा-वीस मिनिटात त्याला सोडलं जातं. शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरेल, तेव्हा सगळ्यांची मस्ती जिरून जाईल. हा हल्ला माझ्यावरचा नाही तर तमाम शेतकऱ्यांवरचा आहे. आई तुळजाभवानी, शेतकरी आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, त्यामुळे ही ताकद मोठी आहे, त्यामुळेच मी निघालो आहे..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com