माझ्याविरोधात ६० दिवसांत ३३ तक्रारी दाखल; पण हा रणजितसिंह कोणाच्या बापाला घाबरत नाही!

कोण म्हणतंय पाच लिटर पेट्रोल चोरून नेलं. कोण म्हणतंय देवाच्या दर्शनाला गाडी नेली, त्याचं पैसे दिलं नाहीत.
ranjit singh naik nimbalkar
ranjit singh naik nimbalkar sarkarnama
Published on
Updated on

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : सध्या महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींना अडचणीत आणण्याचं काम चाललं आहे. आमदार गोपीचंद पडळकर, जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत आणि माझ्यावर तर तब्बल ३३ बोगस तक्रारी दाखल केल्या आहेत. माझ्या विरोधात या ३३ तक्रारी अवघ्या ६० दिवसांत दाखल झाल्या आहेत. पण, माझ्यावर किती गुन्हे दाखल करायचे आहेत, तेवढे गुन्हे दाखल करा. जोपर्यंत ही जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत हा रणजितसिंह निंबाळकर कोणाच्या बापाला घाबरत नाही, असा इशारा माढ्याचे भाजपचे (bjp) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. (In 60 days, 33 police complaints were lodged against me : Ranjit Singh Nimbalkar)

जागर शेतकऱ्यांचा; आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाच्या टेंभुर्णीत झालेल्या सांगता सभेत खासदार निंबाळकर यांनी आपल्यावर वारंवार दाखल होत असलेल्या गुन्ह्याबाबत वाच्यता केली. ते म्हणाले की, माझ्यावर तब्बल ३३ बोगस तक्रारी दाखल केल्या आहेत. कोण म्हणतंय पाच लिटर पेट्रोल चोरून नेलं. कोण म्हणतंय देवाच्या दर्शनाला गाडी नेली, त्याचं पैसे दिलं नाहीत. खासदाराला बदनाम करण्यासाठी विविध तक्रारी माझ्याविरोधात दाखल केल्या जात आहेत. हे बोलणारे सगळे पोपट आहेत. पण, या सर्वांचा बोलविता धनी एकच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. माझ्या विरोधात ३३ तक्रारी आहेत आणि त्यामागे एकच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या ३३ तक्रारी अवघ्या ६० दिवसांत दाखल झाल्या आहेत. हे ॲव्हरेज एवढं मोठं आहे की, एका दिवसाआड तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.

ranjit singh naik nimbalkar
भगिरथ भालकेंच्या शब्दाचा मान राखत जयंत पाटलांनी शेजारधर्म पाळला!

आम्हाला आता एकच काम उरलं आहे. पोलिस ठाण्याला आलेल्या तक्रारीवर उत्तर देणं. आम्ही त्याच्यात नव्हतो. एवढ्यापर्यंत खासदाराला जखडून ठेवण्याचे काम केले जात आहे. बघणार बघणार नाही तर म्हणणार जेवढं गुन्हे दाखल करायचे तेवढे खोटे गुन्हे दाखल करा. मी जेलमध्ये जाऊन बसतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सरकार आता मला लोकांपासून दूर ठेवू शकणार नाही. विशेष करून ज्यांना फलटणमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. फलटणकर... या न्यायालयीन यंत्रणेचा कसा दुरुपयोग करावा, हे या राष्ट्रवादीच्या लोकांकडून शिकावे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

ranjit singh naik nimbalkar
शिवसेनेचा दे धक्का! राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला पुण्यात पाडणार खिंडार

ते म्हणाले की, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मतदारसंघात खासदार नाहीत, अशा बातम्या वर्तमानपत्रामधून छापून आणल्या जातात. येथपर्यंत मला विळखा मारून ठेवण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी जेवढं काम केले आहे, त्यामध्ये आपला एक नंबर लागतो. काही लाख कोटी रुपयांच्या घरात आपण कामं केलेली आहेत. पण, यांच्या अडवण्याने मी थांबणार नाही. जे स्वप्न या माढा लोकसभा मतदारसंघासाठी बिघतलं आहे, ते निश्चितपणे १०० टक्के पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही. हा शब्द मी माढ्यातील जनतेला देतो.

ranjit singh naik nimbalkar
भाजपचा आक्रोश, महाराष्ट्राच्या चेरापुंजीत प्यायला पाणीही मिळेना!

लोकांचे आश्रू पुसताना आपण भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवत चाललो आहे, त्याचे परिणाम आमच्या दोन चार आमदाराला काय सर्वच आमदारांना भोगावे लागणार आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मोठे उदाहरण समोर बसलेले आहेत. माझ्यावर किती गुन्हे दाखल करायचे आहेत, तेवढे गुन्हे दाखल करा. जोपर्यंत ही जनता माझ्या पाठिशी आहे, तोपर्यंत हा रणजितसिंह निंबाळकर कोणाच्या बापला घाबरत नाही. प्रसंगी ही सर्व कवच कुंडलं टाकून आम्ही रस्त्यावर उतरायलाही मागंपुढं पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com