श्रीगोंद्यात सत्तेसाठी कुरघोडी

अहमदनगर जिल्हा परिषद, श्रीगोंदे पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.
Leaders of Shrigonda
Leaders of ShrigondaSarkarnama
Published on
Updated on

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद, श्रीगोंदे पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकारण तापले आहे. त्यामुळे तालुक्यातील दिग्गज नेत्यांत सत्तेसाठी कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. ( In Shrigonda, the political maneuvering for power continues )

सार्वजनिक प्रश्न जागीच असताना व त्याच समस्यांचा आधार घेवून तालुक्यात राजकारण करणाऱ्या पाचपुते, नागवडे व जगताप या घराण्यांमध्ये आता चांगलीच जुंपण्याची शक्यता वाढली आहे. यात आमदार बबनराव पाचपुते शांत राहून गंमत पाहत असले तरी माजी आमदार राहुल जगताप व कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यातील हाडवैर चांगलेच वाढले आहे. तालुक्याच्या राजकारणात 'नंबर -वन' होण्यासाठी या दोन कुटूंबात लागलेली चढाओढ पाचपुते यांच्यासाठी टॉनिक आहे.

Leaders of Shrigonda
बेलवंडीत अण्णासाहेब शेलारांच्या विरुद्ध नागवडे यांचा मास्टरप्लॅन

गेल्या विधानसभेला आमदार असतानाही राहूल जगताप यांनी तलवार म्यान केली. काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना आमदार करण्यासाठी जोरदार यंत्रणा राजेंद्र नागवडे व त्यांची टीम राबवत होती. राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना चालून आली, मात्र राजेंद्र नागवडे यांनी माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून थेट भाजपात प्रवेश केला आणि त्यांचे पारंपारिक हाडवैरी बबनराव पाचपुते यांच्या विजयात वाटा उचलला. त्यांनतर नागवडे व जगताप यांच्यातील अंतर वाढत गेले, पण जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकत्र आले आणि दोघांनी बिनविरोधची संधी साधत ठरावधारक कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळविले. नागवडे व कुकडी कारखाना निवडणुका सत्ताधाऱ्यांनी जिंकल्या आणि पुन्हा नागवडे व जगताप यांचा सवतासुभा सुरु झाला.

Leaders of Shrigonda
श्रीगोंद्यात काॅंग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी दुभंगणार? सुत्रे राहुल जगताप यांच्या हाती

नागवडे - जगताप यांच्यातील राजकीय संघर्ष आता चांगलाच पेटला असून एकमेकांची जिरविण्यासाठी कुठलीही किंमत मोजण्याची त्यांची तयारी दिसते. तालुक्यात सुरु असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोघे थेटपणे पैशांचा वापर करीत आहेत. राहूल जगताप यांनी बैलगाडा शर्यत घेत केलेल्या शक्तीप्रदर्शनाला राजेंद्र नागवडे यांनी 'चला हवा येवू द्या' या कार्यक्रमाने उत्तर दिले. दोन्हीकडेही गर्दी झाली मात्र यातून नेमका कुणाला व काय फायदा होणार हे नंतर समजेल. करमणूक झाली मात्र तालुक्यात लोकांचे वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न जागीच असताना या दोन नेत्यांनी चालविलेले श्रीमंतीचे राजकारण अनेकांना खुपले आहे. ठराविक कार्यकर्ते झिंदाबादच्या घोषणा देत असले तरी सामान्यांच्या अडचणी जागीच असल्याने नेत्यांनी आमदार झालो या अविर्भावात न वागणेच हिताचे ठरेल.

नागवडे व जगताप हे दोघेही वेगळे लढले तर पाचपुते जिंकणार हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे ते शांत राहून गंमत पाहत आहेत. पाचपुते तालुक्याचे आमदार असतानाही त्यांचा संपर्क पुर्वीसारखा नाही. तालुक्यातील विकास थांबला आहे याला तेही कारणीभूत असल्याने भविष्यात एखादा फाटका व्यक्ती पुढे आला तर सगळ्यांना घरी बसवेल याची जाणीव सगळ्यांनीच ठेवली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com