Vijay Mane, Crime News
Vijay Mane, Crime NewsSarkarnama

महिला अधिकाऱ्याचा विनयभंग : उपवनसंरक्षकावर गुन्हा दाखल

कुपवाड पोलिस ठाण्यात मानेंविरुध्द तक्रार दाखल केरण्यात आली आहे.
Published on

कुपवाड : वनविभागातील (Forest Department) एका अधिकारी महिलेचा विनयभंग (Moleism) केल्याप्रकरणी वनविभागाच्या उपवनसंरक्षक विजय माने (Vijay Mane) यांच्यावर कुपवाड पोलिस ठाण्यात (Sangali Police) रात्री उशिरा गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Kupwad Crime News)

Vijay Mane, Crime News
राजद्रोहाचा गुन्हा लावणाऱ्या त्या पोलिसांना सेवेतून तडीपार व्हावे लागेल…

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पीडित महिला अधिकारी जिल्ह्यात अन्य ठिकाणी कार्यरत आहे. 28 एप्रिल रोजी सरकारी कामाची माहिती देण्यासाठी कुपवाड वनविभागाच्या मुख्य कार्यालयात उपवनसंरक्षक माने यांच्या कक्षात त्या गेल्या होत्या. यावेळी संशयित माने यांनी त्यांच्या डायरीतील नोंदी बघण्याचा बहाण्याने त्यांना जवळ बोलावून घेतले. त्यानंतर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी पिडीत महिलेने त्यांना विरोध केला. त्यानंतरही माने यानी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने सुटका करुन घेतली. या प्रकाराने त्यांना धक्का बसला. आज कुपवाड पोलिस ठाण्यात येऊन मानेंविरुध्द तक्रार दाखल केली.

Vijay Mane, Crime News
त्या व्हायरल पत्रामुळे कृष्ण प्रकाश व्यतिथ : मी केलेल्या कारवाईमुळे नाखूष व्यक्तींचा हा उद्योग!

घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांनी पोलीस ठाण्यात येऊन पिडीतेची विचारपूस केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपवनसंरक्षक माने यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील तपास करीत आहेत. संशयित माने सध्या प्रशिक्षणासाठी अमरावती येथे गेले असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी वनविभागातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती मागवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com