खासदार होताच महाडिकांचा राजन पाटलांना इशारा : ‘आता त्रास दिला तर...’

गेल्या दोन-अडीच वर्षांत विरोधकांनी आम्हाला खूप त्रास दिला : धनंजय महाडिक
Rajan Patil- Dhananjay Mahadik
Rajan Patil- Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : मागील दोन-अडीच वर्षांत विरोधकांच्या गटाकडून खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला. अगदी भीमा सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये, यासाठीही प्रयत्न झाले. पण मीही आता खासदार झालो असून सत्तेत आलो आहे. तुम्ही पुन्हा आम्हाला त्रास दिल्यास आम्हालाही तशीच भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा भाजपचे (bjp) नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांना दिला. (In the last two-and half years, opposition has bothered us a lot : Dhananjay Mahadik)

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी पुळूज मतदारसंघातून, तर त्यांचे चिरंजीव विश्वजित महाडिक यांनी सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या पाटलांना इशारा दिला.

Rajan Patil- Dhananjay Mahadik
Uday Samant: ‘त्या’ गोष्टींना कंटाळून मी गुवाहाटीला गेलो : उदय सामंतांनी सांगितले कारण...

खासदार महाडिक म्हणाले की, भीमा साखर कारखान्याला विरोधकांच्या गटाकडून मागील दोन-अडीच वर्षांत खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे. भीमा कारखाना सुरू होऊ नये, यासाठीही प्रयत्न झाले होते. अनेकांच्या मार्फत तक्रारींसह उच्च न्यायालयात खटले दाखल करण्यापर्यत त्यांची मजल गेली आहे. पण, भाजपच्या मदतीने मीही आता खासदार झालो आहे, त्यामुळे मीपण सध्या सत्तेत आलो आहे.

Rajan Patil- Dhananjay Mahadik
Eknath Shinde: एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येऊन घेणार मोठा निर्णय!

त्यामुळे तुम्ही मला त्रास देऊ नका, असे आवाहन मी संबंधितांना केले आहे. मला पुन्हा त्रास दिला तर, मलाही त्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल. तशी संस्कृती व परंपरा आमची नाही. पण, ती भूमिका घेण्यास भाग पडले तर तुम्हालाच ते अडचणीच ठरले. तुम्ही ज्या संस्था चालवता, त्या आता अडचणीत आहेत आणि त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्य सहभागी आहेत. आम्ही जर तशी भूमिका घेतली तर तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो, असा इशाराही धनंजय महाडिक यांनी दिला आहे.

परिचारक, पाटलांना बिनविरोधसाठी आवाहन

भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शेतकरी हितासाठी बिनविरोध करू, त्यासाठी आपण मदत करावी, असे आवाहन आपण माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राजन पाटील या दोघांनाही केले आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी या वेळी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com