कराड उपजिल्हा रूग्णालयात गैरसोय; प्रहार संघटनेचा 'रास्ता रोको'

प्रहार संघटनेचे Prahar Sanghtna मनोज माळी Manoj Mali गेल्या सहा दिवसांपासून उपजिल्हा रूग्णालयातील Sub-district hospital गैरसोयींबाबत About inconvenience उपोषणाला बसले आहेत.
Prahar Sanghtna Andolan
Prahar Sanghtna Andolansarkarnama

कऱ्हाड : कराडमधील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत प्रहार संघटनेने आज कोल्हापूर नाक्यावर 'रास्ता रोको' केला. तब्बल अर्धा तास आंदोलकांनी मार्ग रोखून धरला होता. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

प्रहार संघटनेचे मनोज माळी गेल्या सहा दिवसांपासून उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींबाबत उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रहारसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापूर नाक्यावर 'रास्ता रोको' केला. रस्ता अडवल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

Prahar Sanghtna Andolan
महाविकास आघाडी गेली तरच महाराष्ट्राचा विकास : भागवत कराड

उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवेच्या गैरसोयी आहेत. त्याबाबत मनोज माळी यांचे उपोषण सुरू आहे. प्रशासनासह मंत्री, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे व भानुदास भानुदास डाईनगडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर नाका येथे 'रास्ता रोको' झाला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जावेद नायकवडी, शिवाजी चव्हाण, माधुरी टोणपे, अशोक पवार, वैभव चव्हाण उपस्थित होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंत घोषणाबाजी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com