-रूपेश कदम
Maan Jarange Patil News : उगा नादाला लागू नका, चाललंय ते चालू द्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात साष्ट पिंपळगाव येथे केलेले आंदोलन साडेतीन महिने चालले. ऐक म्हणावं विरोध करणाऱ्याला. आता या सरकारशीसुद्धा लढतोय. याचा अर्थ आम्ही मराठ्यांशी प्रामाणिक आहोत. पक्ष, बिक्षाला आम्ही मोजीत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दहिवडीतील सभेत दिला.
रात्री ११ वाजता दहिवडीतील Dahiwadi सभेस्थळी जरांगे पाटलांचे Manoj Jarange Patil आगमन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना गाडीतूनच व्यासपीठानजीक आणण्यात आले. जरांगे पाटील यांच्यासोबत माणमधील वीस समन्वयक व्यासपीठावर गेले. या सर्वांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या भाषणास सुरुवात झाली.
न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक सभा माणदेशाने शुक्रवारी रात्री अनुभवली. रात्री अकरा वाजता सुरू होऊन बाराच्या सुमारास संपलेली सातारा जिल्ह्यातील कदाचित ही पहिलीच सभा. या सभेस मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता 'टप्प्यात आला की वाजिवलाच' हे मनोज जरांगे पाटील यांचे शब्द तंतोतंत खरे ठरल्याची अनुभूती माणदेशाला आली.
त्यांचं सरकार होतं तेव्हा कुठं गेले होते? आमचं सरकार आल्यावरच सुरू झालं? असा आरोप करणाऱ्यांबद्दल मनोज जरांगे पाटील म्हणाले उगा नादाला लागू नका, चाललंय ते चालू द्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात साष्ट पिंपळगाव येथे केलेले आंदोलन साडेतीन महिने चालले. Maharashtra Political News
ऐक म्हणावं ते विरोध करणाऱ्याला. आता या सरकारशीसुद्धा लढतोय. याचा अर्थ आम्ही मराठ्यांशी प्रामाणिक आहोत. पक्ष बिक्षाला आम्ही मोजीत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आपल्या एका सहकाऱ्याने आरक्षणाच्या लढाईत नुकतीच आत्महत्या केली असल्यामुळे व्यथित झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी फुलांच्या उधळणीला तसेच पायघड्यांनासुद्धा नकार देत दुसरीकडून थेट व्यासपीठावर येणे पसंद केले.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.