Vijay Tad murder case: माजी नगरसेवकाचा खून; पोलिसांना गुंगारा देणारा माजी उपनगराध्यक्ष न्यायालयात शरण

Umesh Sawant Present- IN Court After 14 Months:ताड यांचा खून माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत याच्या चिथावणीवरुन केल्याचे तपासात आढळले आहे. सावंत १४ महिन्यापासून फरार होता.
Vijay Tad murder case
Vijay Tad murder caseSarkarnama

Sangali News, 31 May: कारमधून आपल्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करुन दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार असलेला मुख्य सूत्रधार अखेर सांगली न्यायालयात शरण आला आहे. चौदा महिन्यांपासून तो फरार होता. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

भाजपचे माजी नगरसेवक, जत नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विजय शिवाजी ताड (Vijay Tad) यांच्या खून प्रकरणात सावंत हा मुख्य सूत्रधार असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. चौदा महिन्यांपासून फरार असणारा सावंत (Umesh Sawant) हा अखेर बुधवारी सांगली न्यायालयात शरण आला होता. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

१७ मार्च २०२३ रोजी विजय ताड यांचा खून झाला होता. जत येथील अल्फान्सो इंग्लिश शाळेजवळ दुपारी विजय ताड हे चारचाकीतून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात होते. त्यावेळी बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार करुन डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला होता.

काल (गुरुवारी) पोलिसांनी जतचा माजी उपनगराध्यक्ष असलेल्या उमेश सावंत याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत ताब्यात घेतले. तासभर चौकशी केल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. आज (शुक्रवारी) सावंत याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Tad murder case
Bhusawal firing: माजी नगरसेवक हत्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या मुख्य आरोपीच्या मुसक्या

ताड यांचा खून माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत याच्या चिथावणीवरुन व पूर्वनियोजित कट करुन केल्याचे तपासात आढळले होते. त्यानंतर मुख्य सूत्रधार उमेश सावंत मागील १४ महिन्यापासून फरार होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताड यांच्या खूनप्रकरणी संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७, रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाया दिनकर मदने (२४, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), आकाश सुधाकर इनखंडे (२४, रा. के. एम. हायस्कूलजवळ सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (२७ रा. आर. आर. कॉलेज जवळ जत) या चौघांना अटक केली होती. पोलिसांनी सावंत त्याची माहिती देणाऱ्यास २५ हजाराचे बक्षीसही जाहीर केले होते. त्याच्या टोळीवर मोक्काही लावण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com