Jaykumar Gore : जनतेचे 'सो काॅल्ड नेते' म्हणत जयकुमार गोरेंचा शरद पवार, रामराजे नाईक-निंबाळकरांवर निशाणा!

Political News : 14 किलोमीटरचा टनेल पूर्ण झाला, त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही.
Sharad Pawar, Jaykumar Gore
Sharad Pawar, Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Bjp News : मी आमदार असताना जे-जे सरकार होते, त्यांनी मदत केली. काही ठिकाणी संघर्ष करून मदत आणावी लागली. ती मदत मिळत असताना काम सुरू राहिल याची काळजी घेतली. आज जो 14 किलोमीटरचा टनेल पूर्ण झाला, त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही. ज्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही, असे तत्कालीन नेते, सो-काॅल्ड जनतेचे राजे म्हणत होते. दुर्देवाने सांगाव लागत की 7-8 वर्षापूर्वी शरद पवार आले. तेंव्हा ते म्हणाले होते की, येथे पाणी शक्यच नाही. त्यामुळे पाणी देणार कोठून असे म्हणाले होते. त्यामुळे खटाव-माणचा दुष्काळ हटेल, असे भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी म्हटले आहे. 

जिहे-कटापूर योजनेच्या 14 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या कामाची जयकुमार गोरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी गोरे म्हणाले, जिहे- कठापूरच्या योजनेच्या 14 किलोमीटर लांबीच्या टनेलचे काम पूर्णत्वाला गेले. या टनेलमधून माण- खटाव मधील किमान 60 गावांना पाणी जाईल. गेल्या 22-25 वर्षांपासून मान्यता असणारी ही योजना केवळ मंजूर झाली आणि तशीच राहिली होती.

Sharad Pawar, Jaykumar Gore
Nanded Loksabha Constituency News : नांदेड लोकसभा जिंकण्यासाठी भाजपची तयारी, पण कार्यकर्त्यांची नाराजी नडणार..

मला आमदार केले तेंव्हा लोकांना खूप अपेक्षा होत्या. मी लोकांना स्वप्न दाखवली. त्या गोष्टीसाठी मी गेल्या 14 वर्षांपासून झपाटल्यासारख काम करतोय. साधारण 287 कोटीची योजना जवळजवळ 2500 कोटी चाललेली आहे. यामध्ये वाढीव काम करतोय, यामध्ये नेरमधून दोन तर आंधळीमधून एक उपसा सिंचन योजनेचे काम चालू आहे. नव्याने सव्वा टीएमसी पाणी योजना असून त्याचं काम पुढे जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) या भागात यायचे होते. आता आमचीही भावना आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या योजनेत प्रचंड मोठ योगदान आहे. त्या लोकांच्या हातून पाण्याचे पूजन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. पाणी पूजन राजकीय हेतून नव्हे तर उर्वरित कामाला लागेल ती मदत होत असते. त्यामुळे यामध्ये स्वार्थही आणि ज्यांनी योगदान दिले त्याबद्दल कृतज्ञता आहे, असे आमदार गोरे म्हणाले.   

माण- खटावमधील 35 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार

खटाव- माणचा दुष्काळ हटेल अन् शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचेल. आता पाणी सोडायचा आवकाश आहे, माण नदीत जाईल, तेथून आंधळी धरणात आणि तेथून शेतकऱ्यांच्या शेतात पोहचेल. या योजनेसाठी अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली. सरकारच्या अडचणी, मंत्र्याच्या अडचणी त्यासोबत कोणाच इंटरेस्ट असेल तर त्याला अधिकाऱ्यांनी बाजूला ठेवून काम केले. या बोगद्यातून सव्वातीन टीएमसी पाणी जाणार असल्याने साडेचार हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. नव्याने 1.13 टीएमसी पाणी घेतले आहे, त्यामध्ये 2 ते अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. साधारण 30 ते 35 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येवून येतील दुष्काळ कायमचा मिटणार असल्याचे आमदार गोरे म्हणाले. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अडीच वर्षात महाविकास आघाडीने निधी दिला नाही

भाजपचे सरकार आले. लक्ष्मण इनामदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरूवर्य होते. यामुळे लक्ष्मण इनामदार उपसा सिंचन योजना या पाणी योजनेचे नामाकरण झाले आहे. जेंव्हा अडीच वर्ष आमचे सरकार नव्हतं, तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 3 वेळी गेलो. तेव्हा महाविकास आघाडी सरकार या योजनेला निधी देत नाही म्हटल्यावर पंतप्रधानांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेत या योजनेचा समावेश केला. तेव्हा तातडीने पंतप्रधानांनी 250 कोटी दिले. महाविकास आघाडी सरकारने निधी न दिल्याचा आरोपही आमदार गोरे यांनी केला आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Sharad Pawar, Jaykumar Gore
Jaykumar Gore News : जिहे-कटापूरचे पाणी पंधरा दिवसात माणमध्ये; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com