कॅडबरीच्या गोडव्याने संपवली जयंत पाटील आणि सदाभाऊ खोतांमधील कटूता!

Jayant Patil | Sadabhau Khot | "कुछ मिठा हो जाये" च्या संदेशाने जिल्ह्यात नवी समीकरण आकाराला येणार?
Sadabhau Khot - Jayant Patil
Sadabhau Khot - Jayant Patil Sarkarnama

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचे मागच्या काही वर्षांपासूनचे नाते म्हणजे अगदी विळ्या-भोपळ्याचे वैर झाले होते. मात्र काल दोघांनीही एकमेकांना कॅडबरी भरवत 'कुछ मिठा हो जाये' असा संदेश दिल्याने आता हा गोडवा दोघांच्या नात्यातील कटुता दुर करणार का असा सवाल विचारला जात आहे.

काल जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत हे कट्टर विरोधक इस्लामपूर नगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन व ड्रेनेज नेटवर्क कामाचा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी जयंतरावांनी सदाभाऊंना कॅडबरी भरवली आणि कटूता दूर करत ‘कुछ मिठा हो जाए’चा संदेश पेरला.

Sadabhau Khot - Jayant Patil
सातव्या विमानातुन १८२ जण भारतात; नारायण राणेंनी केले देशवासीयांचे स्वागत

जयंत पाटील यांनी याच व्यासपीठावरुन बोलताना नगरपालिकेला निधीची कमतरता भासू न देण्याचे आश्वासन दिले. तसेच नगराध्यक्ष निशीकांत कामत यांच्यावरही सदाभाऊंच्याच उपस्थितत सडकून टीका केली. 'पृथ्वीवर नसतील तितके आजार गेल्या पाच वर्षाच्या सत्तेत झाले', अशी तोफ त्यांनी डागली. शहरातील नागरिकांना घरटी २० हजार रुपये आरोग्याच्या खर्चासाठी मोजावे लागले, असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

Sadabhau Khot - Jayant Patil
गिरीश महाजनांची घोषणा होताच नेत्यांपेक्षा `प्याद्यांचीच ऊठबस वाढली!

जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना अचानक आपला मोर्चा सदाभाऊंकडे वळवला. "तुम्ही तिकडे वरती राहता, आम्हाला जेवायला केव्हा बोलावता? जेवण राहु द्या, किमान चहा-पाण्याला तरी बोलवा. आम्ही येताना सोबत खासदारांना आणतो, कारण मागच्यावेळी तुम्ही त्यांचा प्रचार केला होता" असे म्हणताच हशा पिकला. एकूणच काल या दोन्ही नेत्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले, त्यामुळे हे वातावरण आता जिल्ह्याच्या राजकारणात काही नवीन समीरकरण तयार होण्याची बीजरोपण ठरणार का हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com