Sangli Politics : पवारांच्या 'वजीरा'ला महायुतीचा वेढा, बालेकिल्ल्यातच घेरलं!

Mahayuti Melava Organize at Islampur Sangli : शरद पवारांचे अत्यंत विश्वास आणि निकटवर्तीय असलेल्या नेत्याला महायुतीने घेरलं....
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

अनिल कदम-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांचा इस्लामपूरचा बालेकिल्ला महायुतीने घेरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी एन्ट्री केली होती. आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने इस्लामपुरात 22 फेब्रुवारीला घटक पक्षांचा मेळावा आयोजित केला आहे. रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यामुळे महायुतीकडून इस्लामपूर मतदारसंघ मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

Sharad Pawar
Bjp News : 'मुख्यमंत्री कैसा हो, देवेंद्रजी जैसा हो'; भाजपच्या सभेत घोषणा, शिंदे गट पेचात

वाळवा तालुका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तालुक्यावर जयंतरावांची पकड असल्याने विरोधकांना हातपाय पसरायला वाव नाही. जयंत पाटील यांच्या विरोधात अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पाटील यांच्या मतदारसंघात प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये यश आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजितदादा गट सांगली जिल्ह्यातही कार्यरत आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या इस्लामपुरात येऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी पक्षाचे कार्यालय सुरू केले.

तालुक्यात भाजप, शिवसेना यांच्यासह काही घटकपक्षही जयंत पाटील यांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यातच राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे अजित पवारांच्या गटाचाही या विरोधकांमध्ये समावेश झाला आहे. प्रत्येक गटाचे नेतृत्व करणारे वेगवेगळे नेते आहेत. इस्लामपुरात भाजपमध्येच निशिकांत पाटील, राहुल महाडिक, विक्रम पाटील यांचे वेगवेगळे गट आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचीही रयत शेतकरी संघटना महायुतीचा भाग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांचाही गटही आहे. या सर्वांनी आपापले गट मजबूत करण्यासाठी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगलीमध्ये गत महिन्यात घटक पक्षांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यामध्ये महायुतीचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घटक पक्षांना न्याय मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. घटक पक्षांची अवस्था बँड, बेंजोमधल्या वाजंत्र्यासारखी असल्याचे वक्तव्य केले होते. घटक पक्षांना कामापुरते वापरले जात आहे. घटक पक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भाजप नेत्यानी माजी मंत्री खोत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सदाभाऊ पुन्हा ऍक्टिव्ह झाले असल्याचे दिसून येते.

इस्लामपुरात सदाभाऊ खोत यांनीही 22 फेब्रुवारीला महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा आयोजित आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निमंत्रित केले आहे. अजितदादा यांचा दौरा झाल्यानंतर इस्लामपूरमध्ये महायुतीचा मेळावा होणार असल्याने जयंत पाटील यांच्याविरोधात फिल्डिंग लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

Sharad Pawar
Jayant Patil On Alliance : शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेस मोठा भाऊ; जयंत पाटील म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com