Solapur Politics: प्रणिती शिंदेंच्या कट्टर विरोधकाची जयंत पाटलांनी घेतली भेट; सोलापूरच्या राजकारणात खळबळ!

Jayant Patil Meet Nasayya Adam: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे.
Jayant Patil - Nasayya Adam
Jayant Patil - Nasayya AdamSarkarnama

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरात दाखल होताच त्यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पाटील हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. वाढदिवस आणि आत्मचरित्र पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. (Jayant Patil meet former Communist Party MLA Nasayya Adam)

जयंत पाटील (Jayant Patil) आणि आडम मास्तर यांच्या या भेटीने सोलापूरच्या (Solapur) राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आडम हे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे आडम-पाटील भेटीने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Jayant Patil - Nasayya Adam
Solapur News : जयंत पाटलांनी सांगितली अंदर की बात :‘शिंदे गटात गेलेले कार्यकर्ते निधी मिळाल्यावर पुन्हा राष्ट्रवादीत येतील’

माजी आमदार नसय्या आडम (Nasayya Adam) यांचा आज वाढदिवस आहे. तसेच, त्याच्या आत्मचरित्राचे आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव खासदार सीताराम येचुरी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने येचुरी हे सोलापुरात दाखल झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका लग्नासाठी सोलापुरात आले आहेत. लग्नसोहळा संध्याकाळी असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे.

Jayant Patil - Nasayya Adam
Loksabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे आणि कल्याण सोडणार शिवसेनेला; पक्षाच्या बैठकीनंतर संकेत

जयंत पाटील यांनी सोलापुरात दाखल होताच महेश कोठे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी कोठे, लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले सुधीर खरटमल यांच्याशी चर्चा केली. सोलापुरातील राष्ट्रवादीबाबत त्यांच्यात या वेळी झाली. सोलापूर लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार की मित्रपक्ष असलेले काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी जागा सोडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कोठे यांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी माजी आमदार आडम यांचे घर गाठले. त्या ठिकाणी जात आडम मास्तर यांना जयंत पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, पुस्तक प्रकाशन सोहळ्यालाही सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या भेटीने सोलापूरच्या राजकारणाम मात्र खळबळ उडाली आहे. या वेळी जयंत पाटील यांच्यासोबत माजी महापौर महेश कोठे, माजी आमदार दीपक साळुंखे हे उपस्थित होते.

Jayant Patil - Nasayya Adam
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा नकार; विधानसभेला पसंती!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम यांचा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी २००९ मध्ये पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही पराभव केला. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या आडम यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com