Jayant Patil News : महाविकास आघाडीतील बंडखोरी कशी टाळणार? जयंत पाटलांनी सांगितला 'हा' प्लॅन

NCP Sharad Pawar Politics : बबनराव लोणीकर किती बेईमान आहेत, ते जालना जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलणे जरा जास्तच झाले आहे. पण विधानसभेत त्यांना समजेल.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Satara NCP News :आगामी विधानसभा निवडणूक जिंकणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. महाविकास आघाडीला व राष्ट्रवादीला मिळालेला प्रतिसाद पाहता, आम्ही पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करतोय. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi ) तीनही घटक पक्षांशी चर्चा करुन जागा वाटपाचा निर्णय घेण्यात येईल.

आमच्यातच बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेऊन मित्रपक्षांशी चर्चेनंतरच ज्या जागा आम्हाला सुटतील त्यावरच आम्ही अर्ज मागविणार आहोत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सातारा येथे राष्ट्रवादी भवनात विधानसभानिहाय आढावा घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, संगीता साळुंखे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरा सुरु असून २८ तारखेपर्यंत सर्व जिल्ह्याचा दौरा पूर्ण करणार आहोत. महाविकास आघाडी व राष्ट्रवादीला जनतेने लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

विधानसभेला महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सातारा लोकसभेच्या पराभवावर भाष्य करताना ते म्हणाले, काहींनी चांगले काम केले त्यांचे मी आभार मानतो.

पण, काही ठिकाणी बळाचा व पैशाचा प्रचंड वापर झाला. काही भागात ज्यांनी काम करतो म्हणून सांगून काम सुरु केले व पुन्हा बंद केले असे एक दोन मोठे पुढारी निघाले.त्यामुळे आमचा थोडक्या मतांनी पराभव झाला. पण, पिपाणीने आमची मते खाल्ली, असेही ते म्हणाले.

Jayant Patil
Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या; पुणे पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

कराड उत्तरला शिंदेंना मताधिक्य आहे. पण तेथील कार्यकत्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. तेथील आमचे बाळासाहेब पाटील हे आमदार व माजी मंत्री असून ते खंबीरपणे पुन्हा सुरवात करतील. लोकसभेत कराड दक्षिण व उत्तरला जवळचा उमेदवार नसल्यामुळे आमच्या मतांची घसरण झाली असेल, असे कारणमिमांसा त्यांनी केली.

बबनराव लोणीकर यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटील म्हणाले,बबनराव लोणीकर किती बेईमान आहेत, ते जालना जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलणे जरा जास्तच झाले आहे. पण विधानसभेत त्यांना समजेल.

Jayant Patil
Sanjay Shirsat News : मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याच्या चर्चेने संजय शिरसाटांची उडाली झोप ? ; म्हणाले 'अनेक आमदार..'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com