Vijaysinh Mohite–Patill : विजयसिंह मोहिते पाटील अस्सल सोनं, पण...; जयंत पाटलांनी भाजपला फटकारलं

Jayant Patil : मोहिते पाटील पाठीशी असल्याशिवाय खासदार, आमदार होता येत नाही. गेल्यावेळी उत्तम जानकर आमच्याकडून लढले, खूप प्रयत्न केले मात्र काही जमले नाही.
Vijaysinh Mohite–Patill, Jayant Patil
Vijaysinh Mohite–Patill, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Madha Political News : लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील आपल्याकडे हवेत, अशी आमची इच्छा होती. मात्र, भाजपनेच आमचे काम सोपे केले. धैर्यशील यांना तिकीट नाकारल्याने तुम्हाला दुःख झाले असेल, आम्हाला मात्र आनंद झाला होता. विजयसिंह मोहिते पाटलांचा Vijaysinh Mohite–Patil आशीर्वाद असल्याशिवाय येथे खासदार किंवा आमदार होत नाही. ते खरे सोने आहेत, मात्र भाजपला त्याची पारखच नाही, असे म्हणत जयंत पाटलांनी शरद पवार गटात आलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांवर स्तुतिसुमने उधळली.

मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार Sharad Pawar गटात प्रवेश केला. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, विजयसिंह मोहिते पाटील हे अस्सल सोने आहे. ते पाठीशी असल्याशिवाय खासदार, आमदार होत येत नाही. गेल्यावेळी उत्तम जानकर आमच्याकडून लढले, खूप प्रयत्न केले मात्र काही जमले नाही. या सोन्याची भाजपला पारखच नाही. त्यासाठी सोनाराची नजर असावी लागते, असे पाटील म्हणाले.

माढ्यातून आपला विजय पक्का असल्याचा विश्वासही पाटलांनी या वेळी व्यक्त केला. धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय 200 टक्के निश्चित आहे, हे माहीत असल्यानेच ए आणि बी फॉर्म घेऊन आलो आहे. आता 16 एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यानंतर मात्र आपला प्रचार रस्तावर राहू न देता घराघरात पोहोचला पाहिजे. रात्र वैऱ्याची असून गाफील राहू नका, असे आवाहनही पाटलांनी कार्यकर्त्यांना केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijaysinh Mohite–Patill, Jayant Patil
Jayant Patil News : 'उत्तम जानकरांचं अन् माझं ठरलंय!' जयंत पाटलांनी वाढवली भाजपची धडधड

जयंत पाटील म्हणाले, आता माढ्याची चिंता करू नका. सांगोला, माण खटावची चिंता करू नका, फलटणकरांचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच. मात्र, धैर्यशील मोहिते पाटलांचं ठरल्यानंतर मला उत्तमराव जानकरांचा फोन आला होता. ते म्हणाले, तुम्ही करताय ते चांगले करताय. आम्ही दोघेही एक होणार आहे. मीही त्यांना साथ देणार आहे. आता जानकरांचं आणि माझंही ठरले आहे, असे म्हणत माढ्यासाठी जानकर मोहिते पाटालांना मदत करतील, असे सूचित केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Vijaysinh Mohite–Patill, Jayant Patil
Dhairysheel Mohite Patil : माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी; शरद पवार गटाचा दहावा उमेदवार जाहीर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com