Kolhapur Politics : स्वतः ची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी शेट्टींची धडपड ? स्वाभिमानी अजूनही तळ्यात-मळ्यात ; प्रागतिक विकास मंचची भूमिका काय...

Raju Shetti News : प्रागतिक विकास मंचची नेमकी भूमिका काय यावरून संभ्रमावस्ता आहे.
Jayant Patil, Raju Shetti News
Jayant Patil, Raju Shetti Newssarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी 'इंडिया' आघाडी सोबत असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे स्वाभिमानी अद्याप 'इंडिया' आघाडीसोबत गेली नसल्याचे राजू शेट्टी सांगतात. प्रागतिक विकास मंचच्या बैठकीत नेत्यांनी 'इंडिया' आघाडी सोबत जाण्याला समर्थता दर्शवली. मात्र, मंचचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) आपल्या भूमिकेवर अजून ठाम नाहीत. या दोन भूमिकेमुळे प्रागतिक विकास मंचची नेमकी भूमिका काय यावरून संभ्रमावस्ता आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न हा स्वाभिमानीचा मुख्य गाभा आहे. शेट्टी यांनी 2014 पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत जात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. मात्र, नंतर त्यांनी भाजपची साथ सोडली. पुढे महाविकास आघाडीसोबत जात त्यांनी सत्तेत राहण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांच्या 12 आमदारांच्या यादीत राजू शेट्टी यांचे नाव होते. पण आमदारांचा विषय न्यायालयात गेल्याने शेट्टी यांनी आघाडीवर नाराजी व्यक्त केली होती.

Jayant Patil, Raju Shetti News
Sharad Pawar On Modi : '' देशात सध्या मोदींचं राज्य, पण त्यांनी नऊ वर्षांत काय केलं, तर पक्ष फोडले अन्....'', शरद पवारांचा हल्लाबोल

सातत्याने आपल्याला बेदखल करत असल्याची भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होत राहिली. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीला शह देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्यातील तेरा छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्र येत प्रागतीक विकास मंचची स्थापना करण्यात आली. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. प्रगतिक विकास मंच मधील काही पक्ष हे पूर्वीपासूनच महाविकास आघाडीत असल्याने त्यांनी 'इंडिया' आघाडीत सहभागी व्हावे, अशी मागणी होत आहे.

प्रागतिक विकास मंच लोकसभेसाठी दोन जागा मागणार

प्रागतिक विकास मंचचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुंबई येथे झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे मंच आघाडीसोबतच राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. विकास मंच लोकसभेसाठी दोन जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. हातकणंगले मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी, तर अन्य एक जागा मागणार असल्याची माहिती आहे.

Jayant Patil, Raju Shetti News
Sharad Pawar News : शरद पवारांचा जळगावात धमाका, तीनवेळा आमदार राहिलेला खानदेशातील भाजपचा 'हा' बडा नेता लावला गळाला

मागील लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा खासदार धैर्यशील माने यांनी पराभव केला. शिवसेनेतून फूड पडल्यानंतर माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे मतदारसंघात माने यांच्याबद्दल नाराजी असल्याचे बोलेल जात आहे. वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या अनेक धोरणांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा शेट्टी यांच्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. अशा परिस्थितीत भाजप (BJP)-इंडिया आघाडी- आणि प्रागतिक विकास मंच अशी तिरंगी लढत झाल्यास इंडिया आघाडी आणि विकास मंचला फटका बसू शकतो. त्यामुळे आघाडी सोबत जाऊन या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना विजय खेचून आणू शकते. असा दावा आमदार जयंत पाटील यांच्यासह राजू शेट्टी करत आहेत.

मातब्बर उमेदवारांची कमतरता

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या भाजप- इंडिया आघाडीकडे मातब्बर उमेदवारांची कमतरता आहे. विकास मंचकडून शेट्टी हे उमेदवार असले तर या दोन बलाढ्य शक्तींपुढे त्यांचा निभाव लागणे शक्य नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप- शिंदेगटाकडे विद्यमान खासदार धैर्यशील माने, राहुल आवाडे, सुरेश हळवणकर हे चेहरे आहेत. पण म्हणावा तसा प्रभाव या मतदारसंघात पडणार नाही. तर इंडिया आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील चेहरा आहेत.

Jayant Patil, Raju Shetti News
Eknath Khadse News : पवारांसमोर खडसेंची जोरदार फटकेबाजी ; फडणवीसांवर वार, अजितदादांना टोला

स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठीच शेट्टीची भूमिका

हातकणंगले मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय होईल, असा दावा शेट्टी करताना दिसत आहेत. शिवाय 'इंडिया' आघाडीलाही बेरजेच्या राजकारणाचा विचार करून शेट्टी यांना सोबत घ्यावेसे वाटते. अशा परिस्थितीत शेट्टी आपले राजकीय स्वार्थ आणि शेतकऱ्यांचे हित साधत भूमिका घेताना दिसत आहेत. एकीकडे भाजपला तीव्र विरोध करत तर दुसरीकडे इंडिया आघाडीवर पहिल्यापासूनच नियंत्रण ठेवत आहेत. शेतकऱ्यांच्या एमएसपी मुद्द्यावरून इंडिया आघाडी पुढे अट ठेवत आघाडीमध्ये आपली प्रतिष्ठा उंचावणे हा उद्देश त्यामागचा असू शकतो.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com