जयंत पाटील यांच्या दौऱ्याने वाढली मोनिका राजळेंसमोरील समस्या

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष ( NCP ) संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील ( Jayant Patil ) हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करत आहेत.
जयंत पाटील
जयंत पाटीलsarkarnama
Published on
Updated on

पाथर्डी : अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करत आहेत. या निमित्त ते शेवगाव पाथर्डी येथे गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे आमदार मोनिका राजळे यांच्यासमोर मोठी चिंता निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

आज संत भगवान बाबांची पावनभूमी असलेल्या शेवगाव-पाथर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा पोहचली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाथर्डी येथील आढावा बैठकीत कार्यकर्त्यांशी हितगुज साधले.

जयंत पाटील
विरोधकांचा निधी वळविला जातोय ! आमदार मोनिका राजळे यांची सरकारवर टीका

जयंत पाटील म्हणाले, पाथर्डीमध्ये पक्षाची नवी कार्यकारिणी तयार होत आहे. ही कार्यकारिणी सर्वासमावेश असावी, प्रत्येक जातधर्मातील लोकांना या कार्यकारिणीत स्थान असावे, काम करणाऱ्या व स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना पक्षात घ्यावे, अशा सूचना करून बुथ कमिट्या ताकदवान करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

सक्षम बुथ कमिट्या असत्या तर आपल्याला पाथर्डीची जागाही जिंकता आली असती व निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या असत्या. मागच्या निवडणुकीत पाथर्डी - शेवगाव विधानसभेत पराभव झाला तरी आपल्या उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली हे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे मायनस झालेली मते येणाऱ्या निवडणुकीत प्लस कशी होतील यासाठी प्रयत्न करा. आता मरगळ झटकून अशी तयारी करा की ही जागाही आपल्याला पुढील निवडणुकीत जिंकता येईल, असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील
जयंत पाटील म्हणतात, 'शिवसेनेच्या आमदारांची छाप पडत नाही'

मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि आजूबाजूच्या परिसरासह पाथर्डीलाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आता पंचनामे केले जात आहेत, पुढील दोन दिवसात मुंबईला पोहचून या अतिवृष्टीग्रस्त भागांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गडावर जाऊन भगवान बाबांचं दर्शन घ्यावं अशी इच्छा होती, मात्र कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने यंदा ते शक्य झाले नाही. मी लवकरच स्वतंत्रपणे भगवान बाबांच्या दर्शनासाठी येईन, असे ते म्हणाले. भगवान गडाच्या पाण्याच्या प्रश्नावरही मुंबईत आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी पाथर्डीचे लोक आपल्याकडे आले असता भगवान गडाला ‘ब’ गटाचा दर्जा मिळवून दिला होता. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून भगवान बाबांची सेवा झाली, असे समाधान जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

जयंत पाटील
अॅड. प्रताप ढाकणे यांच्या पुनर्वसनासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करणार

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, क्षितिज घुले, ॲड. प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले,पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगांव तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, युवक जिल्हाध्यक्ष संजय कोळगे, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

2019मध्ये शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी जागा राखण्यात यश मिळविले. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. पहिल्या काही फे-यांमध्ये ढाकणे यांनी आघाडी घेतली होती. शेवगाव तालुक्यातून ढाकणे यांना आघाडी मिळाली. मात्र पाथर्डी तालुक्यातील मतमोजणी सुरू होताच राजळेंनी पिछाडी भरून काढत आघाडी घेतली होती. पाथर्डी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथे राजळे यांना पाथर्डीतून मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com