

Pune Graduate Constituency: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी या निकालामागील कारणांचा आम्ही निश्चित विचार करू. महायुतीतील अनेक घटकांनी काही गोष्टी केल्या आहेत. चांगले वातावरण असतानाही नेमका असा निकाल का लागला, याचे आत्मपरीक्षण केले जाईल. ‘मौका सबको मिलता है,’ अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिकेवर सूचक भाष्य केले.
मागील निवडणुकीत महायुतीच्या दोन्ही जागा गेल्या होत्या. यंदा एक जागा मिळवण्यात यश आले असले, तरी पदवीधर मतदारसंघातील पराभव स्वीकारावा लागला आहे. चांगले वातावरण आणि अनुकूल परिस्थिती असतानाही अपेक्षित निकाल न लागण्यामागे महायुतीतील घटकांची भूमिका कारणीभूत ठरली का, असा अप्रत्यक्ष सवालही गोरे यांच्या वक्तव्यातून उपस्थित झाला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी गोरे कऱ्हाड येथे आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुणे पदवीधरच्या निकालात जनमताचा कौल आम्ही स्विकारला आहे. मागच्यावेळी आमच्या दोन्ही जागा गेल्या होत्या. यावेळी एक जागा आम्ही मिळवली आहे.
मात्र पदवीधरच्या जागेवर अपयश स्विकारावे लागले आहे. अनेक महायुतीतील घटकांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. चांगले वातावरण असताना नेमके कशामुळे असा निकाल आला याचा आम्ही नक्की विचार करु पण ठिक आहे, 'मौका सबको मिलता है' असे सुचक वक्तव्य करुन मंत्री गोरे यानी महायुतीतील समन्वय आणि घटक पक्षांच्या भूमिकेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.
जिल्हा बँकेत विरोधकांचे स्वतंत्र पॅनेल नसल्याचे सांगत, काही उमेदवारांनी दोन ठिकाणी अर्ज भरल्यामुळे काही जागांवर अर्ज राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील सर्वजण एकत्र आले असून, सध्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्व मतदार आमच्या उमेदवारांना पाठिंबा देतील आणि त्यांना निवडून देतील, असा विश्वासही जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.