Satara BJP News : जयकुमार गोरे म्हणाले, कोण रामराजे...

BJP Satara भाजपच्यावतीने विशेष महा-जनसंपर्क अभियान राबवण्यात येत असून याअभियानातंर्गत जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

Jaykumar Gore News : राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे केले जात आहे. त्यांचे आव्हान भाजपला वाटते का, या प्रश्नावर आमदार जयकुमार गोरे म्हणाले, कोण रामराजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे हेच आमचे शक्तिस्थान असून याच कामाच्या माध्यमातून आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त भाजपच्यावतीने विशेष महा-जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. याअभियानातंर्गत जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती आमदार गोरे Jaykumar Gore यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जयकुमार गोरे म्हणाले, या उपक्रमातंर्गत भाजपचे सर्व आमदार, खासदार तसेच पदाधिकारी जिल्ह्यात एक ते २२ जून दरम्यान पन्नास प्रभावशाली कुटुंबांना भेट देणार आहेत. तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या भेटी घेणार असून लोकसभा मतदारसंघांत देश आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात सभा होतील. या सभा २० ते २५ जून या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होतील.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Satara News : दहा वेळा शड्डू ठोकायची माझी तयारी आहे : शंभूराज देसाईंचे अजितदादांना प्रतिउत्तर

याशिवाय २५ जून रोजी बुद्धिवंतांचा मेळावा, जिल्हास्तरावर व्यापारी संमेलन, खासदार, आमदार यांचा सहभाग असलेले विकास तीर्थ संमेलन तसेच भाजपच्या वेगवेगळ्या सात मोर्चांचा संयुक्त मेळावा, कराड दक्षिण येथे लाभार्थी मेळावा, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून योग शिबिरे होतील. २३ जून रोजी भारतातील बूथ स्तरीय कॉन्फरन्सला नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे युवकांना संबोधित करणार आहेत.

तसेच २० ते ३० जून या दरम्यान मोदी सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती पत्रके घरोघरी वाटण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये या निमित्ताने जवळपास ४० रॅली, दीडशेहून अधिक सभा आणि साडेतीनशेहून अधिक पत्रकार परिषदा होणारा आहेत. कमीत कमी १५ ते २० लाख कुटुंबाशी थेट संपर्क साधला जाणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी भाजपने या निमित्ताने केली आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Pankaja Munde खरंच नाराज ? तुम्हीच बघा नेमकं काय म्हणाल्या ? | BJP | Mahadev Jankar | Sarkarnama

राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे केले आहे.त्यामुळे त्यांचे आव्हान भाजप पुढे असेल का, या प्रश्नावर आमदार जयकुमार गोरे म्हणाले, कोण रामराजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे हेच आमचे शक्तिस्थान असून याच कामाच्या माध्यमातून आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. या संदर्भातील सविस्तर नियोजन केंद्रीय कार्यकारणीद्वारे जाहीर केले जाणार असल्याचे श्री. गोरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com