सातारा : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणात जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांना देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या (शनिवार) नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
जिल्ह्यातील सातारा, मलकापूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, कराड या सात शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे (GFC) चे तीन स्टार रँकिंग प्राप्त झाले आहे. यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे या शहरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड व पाचगणी शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो.
प्लॉस्टिक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना पुर्नवापर योग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.